CWG 2022: जय 'बजरंग'बली !! भारताच्या बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 10:35 PM2022-08-05T22:35:23+5:302022-08-05T22:35:49+5:30
बजरंग पुनियाने कॅनडाच्या खेळाडू ९-२ असं सहज हरवलं.
Commonwealth Games 2022, Bajrang Punia wins Gold Medal: भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा दणक्यात पराभव केला. बजरंग पुनियाने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याला मॅकनीलने काही वेळा टक्कर दिली. पण अखेर बजरंग पुनियाने ९-२ असा अतिशय सहज आणि एकतर्फी प्रकाराने हा सामना जिंकला आणि यंदाच्या स्पर्धेत कुस्तीतील भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
HATTRICK FOR BAJRANG AT CWG 🔥🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
Tokyo Olympics 🥉medalist, 3 time World C'ships medalist @BajrangPunia is on winning streak 🔥🔥 to bag his 3rd consecutive medal at #CommonwealthGames 🥇 🥇🥈
Utter dominance by Bajrang (M-65kg) to win 🥇 #Cheer4India#India4CWG2022
1/1 pic.twitter.com/MmWqoV6jMw
भारताच्या अंशू मलिकला रौप्यपदक!
भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik) हिने ५७ किलो फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशू मलिकने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोत्झचा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिम्नेडीसचा १०-० असा पराभव केला होता. आजच्या सामन्यातही अंशूने सुरूवातीचे २ राऊंड्स मिनिटभराच्या आतच जिंकले. पण नंतर सामना फिरला. दोन वेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिने आपला आक्रमक खेळ दाखवला आणि अखेर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.