दिल्लीकर फलंदाजांची हाराकिरी
By admin | Published: May 1, 2017 12:46 AM2017-05-01T00:46:49+5:302017-05-01T01:46:14+5:30
आयपीएल म्हणजे फक्त फलंदाजांची स्पर्धा आणि गोलंदाजीचा धुव्वा हेच समीकरण आतापर्यंत राहिले आहे. मात्र
आॅनलाईन लोकमत
मोहाली, दि. 1 - आयपीएल म्हणजे फक्त फलंदाजांची स्पर्धा आणि गोलंदाजीचा धुव्वा हेच समीकरण आतापर्यंत राहिले आहे. मात्र यंदाची स्पर्धा याला अपवाद ठरु पाहत आहे. फलंदाजांची हाराकिरी हे त्याचे एक कारण असले तरी गोलंदाजीतील भेदकता आणि अचुकतेला याचे श्रेय द्यावे लागेल. आधी आरसीबीने ४९ धावांची निचांक गाठला होता. आता याच स्पर्धेत दिल्लीने ६७ धावा केल्या आहेत. ही दिल्ली डेअरडेविल्सची आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. मोहालीतील पीएसए स्टेडिअमवर झालेल्या सामन्यावर पंजाब संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यातही पंजाबच्या गोलंदाजांचे वर्चस्व या सामन्यावर होते. जलदगती गोलंदाज संदीप शर्मा याने पहिल्याच षटकांत दिल्लीच्या फलंदाजीला सुरूंग लावला. त्यातून अखेरपर्यंत दिल्लीचे फलंदाज सावरलेच
नाहीत.
जहीर खान ऐवजी या सामन्यात दिल्लीचे कर्णधारपद युवा करुण नायरकडे होते. मात्र नायर ही जबाबदारी पेलु शकला नाही. पूर्ण सत्रात धावा करण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सच्या संघाची फलंदाजी या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार नायर (११) कोरे अॅँडरसन (१८) आणि कागिसो रबाडा (११) हे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठु शकले तर संपूर्ण संघच ६७ धावांवर बाद
झाला.
या सामन्याची धक्कादायक सुरूवात संदीप शर्मा याने केली. पहिल्याच षटकांत सॅम बिलिंग्जला बाद करत त्याने पंजाबच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर त्यानेच तिसऱ्या षटकांत संजू सॅमसनला बाद करत दिल्लीला अडचणीत आणले. त्यानंतर एकापाठोपाठ फलंदाज बाद होत राहिले. पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचुक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. दिल्लीच्या फलंदाजांपैकी नायर वगळता एकालाही १०० च्या स्ट्राईक रेटने धावा करता आल्या नाहीत. ६८ धावांचे सोपे लक्ष्य पार करणे पंजाबला कठीण नव्हते. स्फोटक मार्टिन गुप्टील याने या परिस्थितीचा फायदा घेतला आणि २७ चेंडूत ५० धावा कुटल्या. त्यासोबतच आमला याने पडझड होऊ न देता विजय मिळवून दिला.