दिल्लीचा 27 धावांनी कोलकातावर विजय
By admin | Published: April 30, 2016 07:38 PM2016-04-30T19:38:59+5:302016-04-30T19:41:15+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सने शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव झाला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 30 - दिल्ली डेअरडेव्हिल्सने शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव झाला आहे. संयमी सुरुवात करणारी कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पण शेवटच्या 10 बॉलमध्ये 5 विकेट्स काढत दिल्ली डेअरडेव्हिल्सने विजयावर शिक्कामोर्तब करुन टाकलं. दिल्लीने 18.3 ओव्हर्समध्येच कोलकाताचा संघ ऑल आऊट करुन टाकला.
दिल्लीने कोलकातासमोर 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कोलकाताने संयमी सुरुवात केली होती. रॉबिन उथप्पादेखील उत्तम खेळत होता. त्याने 72 धावा केल्या. मात्र शेवटच्या ओव्हर्समध्ये संघाला गरज असताना त्याने विकेट टाकली. कोलकाता नाईट रायडर्सची खालची फळी पुर्णपणे फेल गेल्याने कोलकाताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.16व्या ओव्हरला 151 वर 6 विकेट असलेली धावसंख्या 18 व्या ओव्हरच्या तिस-या बॉलला ऑल आऊट 159 होती. झहीर खान आणि ब्रॅथवेटने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताच्या गोलंदाजांनी निर्णय योग्य ठरवत पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने दिल्लीच्या दोन विकेट्स काढल्या होत्या. श्रेयस अय्यर आणि कॉक यांना पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने तंबूत परत पाठवलं. दोन धावांवर दोन विकेट अशी दिल्लीची परिस्थिती झाली होती. पण चौथ्या विकेटसाठी करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्लीचा संघ सावरला.
करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने 105 धावांची पार्टनरशिप केली. दिल्ली संघाची चौथ्या विकेटसाठी ही रेकॉर्ड पार्टनरशिप झाली आहे. करुण नायरने 50 चेंडूत 68 धावा केल्या तर सॅम बिलिंग्सने 34 चेंडूत 54 धावा केल्या. दिल्लीकडून रुसेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.