दिल्लीचा पंजाबवर 51 धावांनी विजय
By admin | Published: April 16, 2017 12:00 AM2017-04-16T00:00:26+5:302017-04-16T00:00:26+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने 51 धावांनी विजय मिळविला.
Next
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 15 - दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने 51 धावांनी विजय मिळविला. दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबने 137 धावा केल्या.
गेल्या सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध 97 धावांनी मोठा विजय मिळविल्यानंतर आज झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर विजय नोंदविला. दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबची सुरुवातच खराब झाली. या सामन्यात 20 षटकात 9 बाद 137 धावा किंग्स इलेव्हन पंजाबने केल्या.फलंदाज अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ख्रिस मॉरिसने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबला मोठी धावसंख्या करता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल अवघ्या शून्य धावेवर तंबूत परला. अक्षर पटेल (44), डेव्हिड मिलर (24), मार्गन (22) आणि आमला यांनी 19 धावा केल्या.
याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्सने सॅम बिलिंग्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 188 धावा केल्या. फलंदाज सॅम बिलिंग्सने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने 55 धावा कुटल्या. सॅमसन (19), श्रेयस अय्यर (22) ख्रिस मॉरिस (16) आणि कोरी अॅन्डरसनने नाबाद 39 धावा केल्या.