दिल्ली डेअरव्हिल्सला 167 धावांचे आव्हान
By admin | Published: April 15, 2015 09:41 PM2015-04-15T21:41:59+5:302015-04-15T21:41:59+5:30
पहिल्या षटकात मुरली विजयला फक्त एक धाव मिळाली. ड्युमनीकडे झेल गेल्याने फक्त 19 धावांवर मुरली विजय बाद झाला. विरेंद्र सेहवाग व वृद्धिमान सहा हे दोघे
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - नाणेफेक जिंकत किंग्ज इलेव्हेन पंजाबने फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पहिल्या षटकात मुरली विजयला फक्त एक धाव मिळाली. ड्युमनीकडे झेल गेल्याने फक्त 19 धावांवर मुरली विजय बाद झाला. विरेंद्र सेहवाग व वृद्धिमान सहा हे दोघे वगळता कोणत्याही फलंदाजाला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
दिल्ली डेअरव्हिल्सचा गोलंदाज इम्रान ताहिरची गोलंदाजी परिणामकारक ठरली. 4 षटकांमध्ये ताहिरने 43 धावा देत मॅक्सवेल, बेली व अक्सर पटेल यांना बाद केले.तसेच ड्युमनीने सेहवाग व मिलर यांचा बळी घेतला. तर मॅथ्यू व मिश्रा यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला.