दिल्ली डेयर डेविल्सचा युवराज सिंगला 'नारळ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 07:42 PM2015-12-31T19:42:21+5:302015-12-31T21:50:37+5:30
फॉर्मशी झगडत असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला आज मोठा धक्का बसला आहे, दिल्ली डेयर डेविल्सने त्याला आपल्या चमुमधून मुक्त केले आहे
Next
>ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली - फॉर्मशी झगडत असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला आज मोठा धक्का बसला आहे, दिल्ली डेयर डेविल्सने त्याला आपल्या चमुमधून मुक्त केले आहे, ८ व्या सत्रासाठी त्याला १६ कोटी रुपयात दिल्ली संघाने खरेदी केले होते पण त्यानी साजेशी खेळी केली नाही, संघास निराश केले, त्यामुळे दिल्ली डेयर डेविल्सने युवराज सिंगला नारळ दिला आहे.
दिल्लीने युवराजला आपल्या चमुतून मुक्त केल्यामुळे IPLच्या ९व्या सत्रासाठी त्याच्यावर बोली लागणार हे उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्याची आगामी आस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या T20 संघात वर्णी लागली आहे. आस्ट्रेलिया दौऱ्याच्या कामगिरीवर त्याचे आयपीएल ९ मधील भवितव्य अलंबून आहे. त्यामुळेच ९ व्या सत्रासाठी कोणत्या संघात आणि किती किंमतीमध्ये त्याची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतचे ठरेल.
आयपीएल २०१६च्या ९ सत्रासाठी संघ मालकास खेळाडू बदली करण्याचा अथवा लिलावासाठी उपलब्ध करण्याचा आज शेवटचा दिवस होता. IPLच्या सर्व संघाने मिळून भारतीय १०१ आणि विदेशी ३७ खेळाडूनां आपल्या संघातून मुक्त करत अचंबित केले. यामध्ये षटकाराचां बादशाह युवराजसह, दिनेश कार्तिक, इशांत शर्मा, वीरेंद्र सहवाग, प्रज्ञान ओझा, डेरेन सैमी, डेल स्टेन आणि केविन पीटरसन सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाने मुरली विजय, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल जॉन्सन, शॉन मार्श आणि अक्षर पटेल यांच्यासह एकूण १८ खेळाडूंना रिटेन केले. दिल्ली डेअरडेव्हिल्सने युवराजला रिलीज केले, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा झहीर खान, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, इम्रान ताहिर, ड्युमिनी आणि एल्बी मोर्कल यांच्यासह एकूण २० खेळाडूंना रिटेन केले.
दखल घेण्याची बाब म्हणजे सध्या फार्मात असलेला ऑस्ट्रेल्याचा जोश हैजलवुड याला मुंबई इंडियन्ससे मुक्त केले आहे.