दिल्लीकरांना बसला हैदराबादी तडाखा

By Admin | Published: April 19, 2017 11:49 PM2017-04-19T23:49:16+5:302017-04-20T02:57:58+5:30

आयपीएलच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने 15 धावांनी विजय मिळविला.

Delhi gangrape hit Hyderabadi | दिल्लीकरांना बसला हैदराबादी तडाखा

दिल्लीकरांना बसला हैदराबादी तडाखा

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 19 - आयपीएलच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने 15 धावांनी विजय मिळविला. सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या शिखर धवन आणि केन विल्यमसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 192 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करतांना दिल्ली डेअडेव्हिल्सने सुरुवात चांगली केली. मात्र,  गोलंदाज भुवनेश्वर कुमार, रशिद खान यांच्या गोलंदाजीपुढे दिल्ली डेअडेव्हिल्सच्या फलंदाजांना म्हणावी, तशी कामगिरी करता आली नाही. फलंदाज संजू सॅमसन (42), सॅम बिलिंग्ज (13), करुण नायर (नाबाद 33),  श्रेयश अयर (50) अँजेलो मॅथ्युज याने 31 धावा केल्या. तर, वृषभ पंत शून्य धावेवर बाद झाला.
याआधी सनरायजर्स हैदराबादकडून फलंदाज केन विल्यमसन आणि शिखर धवन यांनी या सामन्यात शानदार फटकेबाजी केली. केन विल्यमसन याने 51 चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार लगावत 89 धावांची खेळी केली. तर, शिखर धवने 50 चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत 70 धावा केल्या. 
केन विल्यमसन याला गोलंदाज क्रिस मॉरीस याने श्रेयश अय्यर करवी झेलबाद केले. सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि युवराज सिंग यांना म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही.  डेव्हिड वॉर्नर अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्याला गोलंदाज क्रिस मॉरीसने बाद केले. तर, युवराज सिंग तीन धावांवर त्रिफळाचीत झाला. मॉइसेस हेन्रिक्वेसने नाबाद 12 धावा आणि दिपक हुड्डाने नाबाद 9 धावा कुटल्या. तर संघाला जादाच्या 4 धावा मिळाल्या. दरम्यान, युवराज सिंगचा आजचा टी-20मधील 200 वा सामना आहे. 
दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून गोलंदाज क्रिस मॉरीस यानेच सनरायजर्स हैदराबादचे चार बळी टिपले. तर सनरायजर्स हैदराबादकडून गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन आणि युवराज सिंग व सिद्धार्थ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 
संक्षिप्त धावफलक :
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ४ बाद १९१ धावा (केन विल्यम्सन ८९, शिखर धवन ७०; ख्रिस मॉरिस ४/२६) वि.वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १७६ धावा (श्रेयस अय्यर ५०*, संजू सॅम्सन ४२, करुण नायर ३३, अँजेलो मॅथ्यूज ३१*; मोहम्मद सिराज २/३९).

Web Title: Delhi gangrape hit Hyderabadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.