दिल्ली-केकेआर आज लढत

By admin | Published: April 10, 2016 03:39 AM2016-04-10T03:39:48+5:302016-04-10T03:39:48+5:30

टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चार षट्कार ठोकून ‘किंग’ बनलेला वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याच्या कामगिरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स

Delhi-KKR fight today | दिल्ली-केकेआर आज लढत

दिल्ली-केकेआर आज लढत

Next

कोलकाता : टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चार षट्कार ठोकून ‘किंग’ बनलेला वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याच्या कामगिरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीदरम्यान विशेष लक्ष राहील. ईडन गार्डनवर आज रविवारची रात्र पुन्हा एकदा अविस्मरणीय करण्याची संधी कार्लोसकडे असेल.
मागच्या रविवारी ब्रेथवेटने इंग्लंडविरुद्ध बेन स्टोक्सला चार षट्कार खेचले होते. त्याचा हा फॉर्म कायम रहावा, असे डेअरडेव्हिल्सला वाटते. दुसरीकडे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तमच आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपेक्षानुरुप कामगिरी न करू शकलेल्या या संघाला संयोजन सुधारावे लागेल. केकेआरला पाच वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी पहिल्या सामन्यापासून विजयी लय कायम राखायची आहे.
दिल्लीने यंदा संघात आमूलाग्र बदल केले. युवा खेळाडूंवर यंदा अधिक विश्वास दाखविण्यात येत आहे. ब्रेथवेटवर या संघाने चार कोटी २० लाख खर्च केले तेव्हा फारसे कुणी ओळखत नसावेत पण टी-२० विश्वचषकाने त्याला स्टार बनविले.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली संघात रिषभ पंत, महिपाल लोमरोर, खलिद अहमद हे १९ वर्षे गटातील खेळाडू आहेत. संजू सॅमसन, करुण नायर, पवन नेगी, श्रेयस अय्यर हे त्यांना मार्गदर्शन करतील.
बंगाल विधानसभा निवडणुकीमुळे केकेआरला पहिल्या टप्प्यात घरच्या मैदानावर केवळ दोनच सामने खेळायला मिळतील. सहा सामने त्यांना बाहेर खेळायचे आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा ईडनवर खेळायला मिळेल. या संघाची भिस्त आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल.
सुनील नारायण संघात परतल्याने या संघाला फिरकी माऱ्यात मोठा दिलासा लाभला. (वृत्तसंस्था)

उभय संघ यातून निवडणार
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण, पीयूष चावला, कुलदीप यादव, मनन शर्मा, अंकित राजपूत, राजगोपाल सतीश, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हेस्टिंग्स, ब्रॉड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅक्सन, ख्रिस लिन, मोर्नी मोर्कल, सुनील नारायण, कोलिन मुन्रो, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन.

दिल्ली डेयरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), क्वींटन डिकॉक, जेपी ड्यूमिनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, ऋषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नाथन कोल्टर नाइल, इम्रान ताहिर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, खलील अहमद, अखिल हर्वेडकर, प्रत्यूष सिंग.

Web Title: Delhi-KKR fight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.