आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली, मुंबई व जयपूरमध्ये धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2015 01:17 AM2015-05-23T01:17:43+5:302015-05-23T01:17:43+5:30

आयपीएल टी-२0 क्रिकेट सामन्यांशी संबंधित सट्टेबाजी टोळीविरुद्ध हवाला आणि अवैध सावकारी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी दिल्ली, मुंबई आणि जयपूरसह अनेक शहरांत धाडी टाकल्या.

Delhi, Mumbai and Jaipur in IPL betting case | आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली, मुंबई व जयपूरमध्ये धाडी

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली, मुंबई व जयपूरमध्ये धाडी

Next

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने आयपीएल टी-२0 क्रिकेट सामन्यांशी संबंधित सट्टेबाजी टोळीविरुद्ध हवाला आणि अवैध सावकारी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी दिल्ली, मुंबई आणि जयपूरसह अनेक शहरांत धाडी टाकल्या. सूत्रांनुसार या शहरातील आठ ते दहा इमारती आणि ठाणे, तसेच गुडगाव येथेही धाडी टाकण्यात आल्या. अहमदाबाद कार्यालयाने या शहरात आपल्या स्थानिकांच्या सहकार्याने छापे मारले. सूत्रांनी म्हटले, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सट्टेबाजीत सक्रिय असणाऱ्यांविरुद्ध तपासासाठी या धाडी टाकण्यात आल्या. एजन्सीने दहा मे रोजीदेखील अशाच प्रकारच्या धाडी टाकल्या होत्या. यावर्षी आयपीएल सामन्यादरम्यानच्या सट्टेबाजीत सहभागी संशयितांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद कार्यालयाच्या आदेशावर मारण्यात आलेल्या धाडीत हवाला आणि बेकायदेशीर सावकारीच्या आरोपाचा तपास करण्यात येत आहे. या प्रक्रियेत ३0 पेक्षा जास्त अधिकारी सहभागी होते. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानी आणि जवळपासच्या भागात धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात दिल्लीत दोन कथित सट्टेबाजांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ रोख २६ लाख रुपये, संगणक, मोबाइल आणि हार्ड ड्राइव्ह जप्त करण्यात आले होते.

मार्च महिन्यात अहमदाबाद कार्यालयाने सट्टेबाजीचे एक रॅकेट उघड केल्याचा दावा करताना वडोदराच्या बाहेरच्या परिसरातील स्थित एका फार्म हाऊसमध्ये काही सट्टेबाजांना अटकही केली होती. त्यानंतर १३ व्यक्तींना अटक केली होती, तसेच दोन प्रमुख संशयित आणि अन्य काही जणांविरुद्ध बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांचे रॅकेट १ हजार ते ४ हजार कोटींदरम्यान असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे

Web Title: Delhi, Mumbai and Jaipur in IPL betting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.