दिग्गज मुष्टियोद्ध्यांकडून आमूलाग्र बदलाची मागणी
By admin | Published: September 1, 2016 04:54 AM2016-09-01T04:54:38+5:302016-09-01T04:54:38+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये मुष्टियोद्ध्यांना एकही पदक न मिळविता आल्यामुळे नाराज दिग्गज खेळाडूंनी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली: रिओ आॅलिम्पिकमध्ये मुष्टियोद्ध्यांना एकही पदक न मिळविता आल्यामुळे नाराज दिग्गज खेळाडूंनी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. या अपयशाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचीही त्यांनी मागणी केली आहे. यामध्ये आॅलिम्पिक पदकविजेता विजेंदर सिंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अखिलकुमार, मोहम्मद अली
कमर यांच्यासह मेरी कोमचा समावेश आहे.
पाच वेळा विश्वविजेती व लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती मेरी कोम म्हणाली, ‘मुष्टियुद्ध
संघटना असणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपण चांगल्या प्रशिक्षकांची
नियुक्ती करू शकतो. शिबिरांमध्ये शिस्त येण्यासाठी चांगल्या परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे.’
अखिलकुमार म्हणाला, ‘उत्तरदायित्वाबाबत मी विजेंदरच्या मताशी सहमत आहे. अनेक वर्षांपासून तेच प्रशिक्षक आहेत. त्यांना बदलण्याची गरज आहे.’ कमर म्हणाला, ‘मोठ्या स्पर्धांसाठी आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होण्याची गरज आहे. यासाठी व्यावसायिक प्रशिक्षकाची गरज आहे.’(वृत्तसंस्था)