कोटला मैदानावर ‘विराट स्टॅँड’ची मागणी
By admin | Published: April 7, 2016 02:09 AM2016-04-07T02:09:12+5:302016-04-07T02:09:12+5:30
वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकाचा ताज मिळवून दिल्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमीच्या नावे एका स्टेडियमचे नामकरण करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकाचा ताज मिळवून दिल्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमीच्या नावे एका स्टेडियमचे नामकरण करण्यात आले आहे. आता दिल्ली क्रिकेटप्रेमींनी सुद्धा फिरोजशाह कोटला मैदानावर सुपर स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावे एकस्टॅँड का असू नये? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी तशी मागणी सुद्धा केली आहे.
दिल्लीच्या विराटने आयसीसी टी-२० विश्वचषकात जबरदस्त प्रदर्शन केले. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. विंडिजविरुद्ध विराटने शानदार खेळी केली. भारत विश्वविजेता होऊ शकला नाही. मात्र, विराटला सलग दुसऱ्यांदा प्लेअर आॅफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. तसेच आयसीसी विश्वचषकाच्या सर्वश्रेष्ठ संघाचा कर्णधार म्हणून विराटला संधी मिळाली. या संघात विराट कोहली आणि आशिष नेहरा हे दोघेही दिल्लीचे खेळाडू आहेत. दरम्यान, फिरोजशाह कोटला मैदानावर आजपर्यंत एकही स्टॅँड क्रिकेटपटूच्या नावे नाही. मुंबईतील वानखेडे मैदानावर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे स्टॅँड बनविण्यात
आले. त्यामुळे विराटच्याही नावे स्टॅँड असावे, अशी मागणी दिल्ली चाहत्यांकडून होत आहे. (वृत्तसंस्था)