वकारचा राजीनामा देण्यास नकार

By admin | Published: April 3, 2016 09:47 PM2016-04-03T21:47:42+5:302016-04-03T21:47:42+5:30

विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतरही संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी मात्र पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

Denying Waqar's resignation | वकारचा राजीनामा देण्यास नकार

वकारचा राजीनामा देण्यास नकार

Next

कराची : विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतरही संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी मात्र पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. खलनायक म्हणून संघाची जबाबदारी सोडण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वकार म्हणाले, ‘माझी प्रतिमा खलनायक म्हणून उभी करण्यात आली आहे. पीसीबी माझ्यावर निलंबनाची कारवाई करणार असेल, तर त्यांना तसे मला लेखी कळवावे लागेल. मला काही अडचण नाही, पण अशा प्रकारे पद सोडण्यास इच्छुक नाही.’
वकार पुढे म्हणाले,‘मी प्रशिक्षकपदासाठी गळ घातली नव्हती. मी त्यासाठी पीसीबीकडे अर्ज केला होता. नजम सेठी यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यांनी माझ्यापुढे भविष्यातील योजना ठेवली होती. त्या आधारावर प्रशिक्षक म्हणून बोर्डाने माझी नियुक्ती केली. २०१५ च्या विश्वकप स्पर्धेनंतर सेठी यांच्यासोबत कधी भेट झाली नाही. मला योजना राबविण्यासाठी अनेक अडचणी आल्या, पण बोर्डाने माझे काही ऐकले नाही. आता प्रत्येक बाबीसाठी मला दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. ते मला निलंबित करण्यास प्रयत्नशील आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Denying Waqar's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.