वाइल्ड कार्ड एंट्री नाकारल्याने मेरी कोम रिओ ऑलिम्पिकला मुकणार

By admin | Published: July 11, 2016 05:56 PM2016-07-11T17:56:29+5:302016-07-11T17:56:29+5:30

भारताची अव्वल मुष्टियोद्धा मेरी कोमला वाइल्ड कार्ड प्रवेश नाकारल्याने ती रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही

Denying wild card entry, Mary Kom will lose the Olympics | वाइल्ड कार्ड एंट्री नाकारल्याने मेरी कोम रिओ ऑलिम्पिकला मुकणार

वाइल्ड कार्ड एंट्री नाकारल्याने मेरी कोम रिओ ऑलिम्पिकला मुकणार

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - भारताची अव्वल मुष्टियोद्धा मेरी कोमला वाइल्ड कार्ड प्रवेश नाकारल्याने ती रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. तब्बल ५ वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणा-या व यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलेल्या मेरी कोमला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) रिओ ऑलिम्पिकसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यास नकार दिल्याने तिचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
ज्या देशाचे ८ हून अधिक मुष्टियोद्धा ऑलिम्पिकमध्ये सहभागी असतील त्या देशातील अन्य खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार नाही असे आयओएने स्पष्ट केले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे ८ पेक्षा जास्त खेळाडू असत्यामुळे आयओएचा हा  (मेरी कॉमला प्रवेश न देण्याचा) निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, अशी प्रतिक्रिया मुष्टियुद्ध हंगामी समितीचे अध्यक्ष किशन नरसी यांनी व्यक्त केली.

Web Title: Denying wild card entry, Mary Kom will lose the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.