वाइल्ड कार्ड एंट्री नाकारल्याने मेरी कोम रिओ ऑलिम्पिकला मुकणार
By admin | Published: June 23, 2016 11:22 AM2016-06-23T11:22:41+5:302016-06-23T11:26:28+5:30
भारताची अव्वल मुष्टियोद्धा मेरी कोमला वाइल्ड कार्ड प्रवेश नाकारल्याने ती रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - भारताची अव्वल मुष्टियोद्धा मेरी कोमला वाइल्ड कार्ड प्रवेश नाकारल्याने ती रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. तब्बल ५ वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणा-या व यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलेल्या मेरी कोमला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) रिओ ऑलिम्पिकसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यास नकार दिल्याने तिचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
ज्या देशाचे ८ हून अधिक मुष्टियोद्धा ऑलिम्पिकमध्ये सहभागी असतील त्या देशातील अन्य खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार नाही असे आयओएने स्पष्ट केले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे ८ पेक्षा जास्त खेळाडू असत्यामुळे आयओएचा हा (मेरी कॉमला प्रवेश न देण्याचा) निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, अशी प्रतिक्रिया मुष्टियुद्ध हंगामी समितीचे अध्यक्ष किशन नरसी यांनी व्यक्त केली.