ग्लास्गोमध्ये चांगली वेळ नोंदवण्याची इच्छा

By admin | Published: July 17, 2014 12:59 AM2014-07-17T00:59:24+5:302014-07-17T00:59:24+5:30

भारताचा संदीप सेजवाल हा इनचेआॅन आशियाई स्पर्धेत पात्र ठरणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे.जलतरण फेडरेशनने भोपाल येथे मंगळवारी घेतलेल्या पात्रता फेरीत संदीपने २७.८५ अशी वेळ नोंदवली

The desire to register a good time in Glasgow | ग्लास्गोमध्ये चांगली वेळ नोंदवण्याची इच्छा

ग्लास्गोमध्ये चांगली वेळ नोंदवण्याची इच्छा

Next

विनय नायडू, मुंबई
भारताचा संदीप सेजवाल हा इनचेआॅन आशियाई स्पर्धेत पात्र ठरणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे.जलतरण फेडरेशनने भोपाल येथे मंगळवारी घेतलेल्या पात्रता फेरीत संदीपने २७.८५ अशी वेळ नोंदवली.यापुर्वीच ग्लास्गो राष्ट्रकूल स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संदीपचा विक्रम थोडक्यात चुकला. संदीपने सेकंद वेळ दिली. यापूर्वी त्याने दिल्ली येथे २७.८४ अशी वेळ
नोंदवली होती.
आॅलिंपिकपटू संदीप नुकताच मानेवर झालेल्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. त्याला सापडलेल्या लयीमुळे संदीप आनंदी आहे.
लोकमतशी बोलताना संदीप म्हणाला, ‘सर्वकाही सुरळीत आहे. मी राष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीवर समाधानी असून ग्लास्गोमध्ये चांगली वेळ नोंदवण्याची इच्छा आहे.’संदीपचे बंगलोरमधील प्रशिक्षक निहार अमिन आणि जलतरण फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्र नानावटी यांनी संदीपचे कौतुक केले आहे. निहार म्हणाले, ‘जर संदीपने ५० ते ६० मायक्रो सेकंदा सुधारणा केली तर मला खूपच आनंद होईल. आशियाड मध्ये त्याला पदकांची सर्वाधिक संधी असेल असेही निहार यांनी सांगितले.

Web Title: The desire to register a good time in Glasgow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.