राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही

By admin | Published: July 16, 2017 02:03 AM2017-07-16T02:03:55+5:302017-07-16T02:03:55+5:30

मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही

Despite being reserved, do not feel insecure | राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही

राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही

Next

नवी दिल्ली: मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही. अजिंक्य रहाणे मात्र समर्पित खेळाडू आहे. त्याच्या मते ‘भारताचा टी-शर्ट घातल्यानंतर असुरक्षा आणि अहंकार दूरच ठेवावा लागतो.’
धर्मशाळा येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत रहाणे भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताने ही कसोटी जिंकून मालिका देखील खिशात घातली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीत रहाणेला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसल्याने १२ व्या खेळाडूच्या भूमिकेत वावरावे लागले.
अजिंक्यने वेस्ट इंडिज दौऱ्यात पाच सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ६७.२० च्या सरासरीने ३३६ धावा ठोकल्या. तो म्हणाला, ‘विंडीजविरुद्धची मालिका माझ्यासाठी विशेष होती. सातत्यपूर्ण कामगिरीसह धावा काढल्याचे समाधान आहे. फलंदाजीतील विविध पैलू पडताळण्याची संधी या निमित्ताने मिळाली.’
खेळात तांत्रिक बदल करण्याऐवजी मानसिकतेत बदल घडवून आणणे माझ्या मते मोठे काम असल्याचे रहाणेने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
विंडीजमध्ये खेळपट्ट्या फलंदाजीसाठी पूरक नसल्याने तेथे माझी प्रत्येक खेळी विशेष अशीच होती. पोर्ट आॅफ स्पेन आणि अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर तर अक्षरश: तारांबळ उडाल्याचे रहाणेने सांगितले. (वृत्तसंस्था)

मी कसोटी संघाचा उपकर्णधार असेल तर याचा अर्थ असा नव्हे की वन डे त १२ वा खेळाडू राहू शकणार नाही. देशाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला जे काम सोपविण्यात आले आहे ते पूर्ण करावे लागते. मी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान अनेक सामन्यात ड्रिंक्स घेऊन मैदानावर गेलो तेव्हा अहंकार मनाला शिवला देखील नाही. मी अहंकार जोपासणारा खेळाडू नाही.

Web Title: Despite being reserved, do not feel insecure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.