देवेंद्र दर्डा, विश्वजित कदम, दरेकर यांची विफाच्या समित्यांवर नियुक्ती
By admin | Published: August 18, 2016 01:02 AM2016-08-18T01:02:01+5:302016-08-18T01:02:01+5:30
लोकमत मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्यासह पुण्याचे विश्वजित कदम तसेच रवींद्र दरेकर यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (विफा) विविध समित्यांच्या
नागपूर : लोकमत मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्यासह पुण्याचे विश्वजित कदम तसेच रवींद्र दरेकर यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (विफा) विविध समित्यांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी असोसिएशनच्या विविध समित्या नव्याने गठित केल्या असून देवेंद्र दर्डा यांची विपणन समितीच्या, विश्वजित कदम यांची अर्थ समितीच्या तर रवींद्र दरेकर (गडचिरोली) यांची विधिव्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. हरीश व्होरा हे निवड समितीचे तर मालोजी राजे हे स्पर्धा समितीचे अध्यक्ष असतील. आ. समीर मेघे हे विपणन समितीत सदस्य आहेत.
देवेंद्र दर्डा (मुंबई) अध्यक्ष असलेल्या विपणन समितीचे डॉ विश्वजित कदम (पुणे), मालोजी राजे (कोल्हापूर), समीर मेघे (नागपूर) व हरीश व्होरा (नागपूर) हे सदस्य असतील. तर, निवड समितीत सुनील धांडे (बीड), सलिम परकोटे (लातूर), सुशील सुर्वे (अमरावती), गॉडविन डीक (अहमदनगर), किरण चौगुले (सोलापूर) सदस्य आहेत. विधिव्यवहार समितीत हरीश व्होरा, डॉ विश्वजित कदम, मालोजी राजे, किरण चौगुले, अॅड. अजित शहा (मुंबई) हे सदस्य असतील. पटेल यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)