देवेंद्रो उपांत्य फेरीत

By admin | Published: June 22, 2016 03:21 AM2016-06-22T03:21:13+5:302016-06-22T03:21:13+5:30

राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता देवेंद्रो सिंहने ४९ किलो गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

Devendro in semifinals | देवेंद्रो उपांत्य फेरीत

देवेंद्रो उपांत्य फेरीत

Next

अजरबजान : राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता देवेंद्रो सिंहने ४९ किलो गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. दुसरीकडे सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६४ किलो गट) व सुमीत सांगवान (८१ किलो गट) यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांना आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. चौथे मानांकन असलेल्या देवेंद्रोने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या के. बांडला सिबुसिसोला ३-०
गुणांनी पराभूत करून आपले पदक निश्चित केले.
आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. मनोजने बुल्गेरियाच्या इस्मेतोव आयरिन याला २-१ने, तर सुमीतने मंगोलियाच्या संदागसुरेन एरदेनेबयार याच्यावर ३-०ने सहज विजय मिळवित आगेकूच केली.
आॅलिम्पिक तिकिटापासून हे दोघे केवळ एक पाऊल मागे आहे. गुरुवारी होणाऱ्या सामन्यात या दोघांनी विजय मिळविल्यास त्यांचा आॅलिम्पिक विजय निश्चित होईल. मंगळवारी मनोजची पहिली लढत झाली. त्यात त्याने बाजी मारली. या पूर्वी झालेल्या पहिल्या फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. याविषयी बोलताना गुरुबक्ष सिंग संधू म्हणाले की, मनोजसाठी हा मोठा सामना होता. त्याचा प्रतिस्पर्धी वेगवान ठोसे मारत होता. त्यातच दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी आयरिनचा जोरदार ठोसा लागल्याने त्याला काहीशी जखमही झाली होती. त्या स्थितीतही त्याने सामना केला. मध्यंतरी त्याचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत मनोजने बाजी मारली. आता मनोजची पुढील लढत आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या तजाकिस्तानच्या राखिमोव शवकताजोन याच्याशी होईल. शवकताजोन याने अंतिम १६मध्ये झालेल्या लढतीत बहारिनच्या विलियम्स राशिल्ड याला नमविले होते, तर सुमीतची पुढील लढत रशियाच्या पेत्र खामुकोव याच्याशी होईल. खामुकोव याने या पूर्वीच्या सामन्यात स्लोवाकियाच्या डेनिस लेजर याला नमविले होते. या स्पर्धेतून आॅलिम्पिकसाठी ३९ कोटा दिला जाणार आहे. त्यात ४९ किलो गटात दोन, तर ५२, ५६, ६०, ६४, ६९, ७५ व ८१ किलो गटात प्रत्येकी पाच, तर ९१
व त्यापेक्षा अधिक गटासाठी प्रत्येकी एक कोटा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Devendro in semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.