धरमशालाची खेळपट्टी उसळी घेणारी

By admin | Published: March 23, 2017 11:31 PM2017-03-23T23:31:08+5:302017-03-23T23:32:30+5:30

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात उद्या (शनिवार)पासून सुरू होत असलेल्या चौथ्या तसेच निर्णायक कसोटीसाठी उसळी घेणारी खेळपट्टी तयार

Dharamsala pitch racket | धरमशालाची खेळपट्टी उसळी घेणारी

धरमशालाची खेळपट्टी उसळी घेणारी

Next

धरमशाला : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात उद्या (शनिवार)पासून सुरू होत असलेल्या चौथ्या तसेच निर्णायक कसोटीसाठी उसळी घेणारी खेळपट्टी तयार करण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे क्युरेटर सुनील चौहान यांनी गुरुवारी दिली. खेळपट्टी तयार करण्यात संघ व्यवस्थापनाचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.
चौहान म्हणाले, ‘‘आजपर्यंत मला कुणाचेही निर्देश मिळालेले नाही. पारंपरिक लौकिक ओळखून मी विकेट तयार करतो. ही खेळपट्टी उसळी घेणारी असेल. येथे पुल आणि कटचे फटके मारणाऱ्या फलंदाजांची ‘चलती’ राहील.’’ रोहित शर्मा याने याच मैदानावर टी-२० सामन्यात शतक ठोकले होते. या मैदानावर ५ दिवस सामना चालेल, असा विश्वासदेखील चौहान यांनी व्यक्त केला. धरमशाला येथे नेहमीच निकाल देणारी खेळपट्टी तयार करीत असतो. रणजी सामन्याचा निकालदेखील चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत लागला होता. येथील परिस्थितीनुसार वेगवान गोलंदाजांना अधिक बळी मिळतात. मध्य प्रदेशाकडून ईश्वर पांडे आणि बंगालकडून अशोक डिंडा यांनी रणजी सामन्यात येथे अधिक बळी घेतले आहेत. प्रत्येक मोसमात आम्ही खेळपट्टीवरील मातीचा वरचा थर बदलत असतो. लुधियाना येथे मिळणारी विशेष प्रकारची माती येथे काही वर्षांपासून वापरण्यात येत आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
गिलख्रिस्टकडून कोहलीचे कौतुक
मेलबोर्न : उभय देशांमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध आता संपायला हवे, असे आवाहन करीत माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने विराट कोहली हा क्रिकेटमधील अप्रतिम कर्णधार असल्याचे म्हटले आहे. या मालिकेत कोहलीचा खेळ अद्यापपर्यंत बहरला नसला, तरी अखेरच्या सामन्यात तो मोठी खेळू करू शकतो. संघाची गरज ओळखून धावा काढण्यात त्याचा हातखंडा आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आणि उत्कृष्ट प्रतिस्पर्धी असल्यामुळे परस्परांचा सन्मान बाळगतात. प्रतिस्पर्धा ही मालिकेचा भाग आहे; पण खेळाडूंमध्ये वैयक्तिक वैर नाही, ही खेळासाठी उत्कृष्ट बाब म्हणावी लागेल.’’

आॅस्ट्रेलिया संघात ओकिफीऐवजी बर्ड-
चौथ्या कसोटीत भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाच्या अंतिम एकादशमध्ये स्टीव्ह ओकिफीऐवजी जॅक्सन बर्ड याला संघात स्थान मिळू शकते. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जात आहे. त्यामुळेच स्टीव्ह स्मिथ बर्डला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळविण्यास 
इच्छुक आहे. 
पुणे कसोटीत विजयाचा नायक ठरलेला ओकिफी पुढच्या दोन्ही कसोट्यांत मात्र तितका प्रभावी ठरला नव्हता. रांचीच्या तिसऱ्या कसोटीत त्याने ७७ षटके गोलंदाजी करूनही यश मिळू शकले नव्हते. दुसरा फिरकी गोलंदाज नाथन लियोन याने आज नेटवर सराव केला नाही; पण कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळविण्यात व उसळी घेणारे चेंडू टाकण्यात तरबेज मानल्या जाणाऱ्या नाथनचे खेळणे निश्चित आहे. 
आज सरावादरम्यान बर्डने डेव्हिड वॉर्नरला गोलंदाजी केली. त्याच्या चेंडूवर वॉर्नर काही वेळ विचलित झाला.

Web Title: Dharamsala pitch racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.