उपांत्य सामन्यासाठी धर्मसेना, केटलब्रा पंच
By admin | Published: March 22, 2015 01:13 AM2015-03-22T01:13:03+5:302015-03-22T01:13:03+5:30
भारत विरूद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रा यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
दुबई : सिडनी येथे २६ मार्च रोजी होणाऱ्या भारत विरूद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रा यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
श्रीलंकेचे रंजन मदुगुले या सामन्यात मॅच रेफरी असतील. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. याशिवाय २९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.
सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे : २४ मार्च : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (आॅकलंड), डेव्हिड बून (मॅच रेफरी), इयान गाऊल्ड व रोड टकर (मैदानी पंच), नायजेल लांग (थर्ड अम्पायर) आणि ब्रूस आॅक्सेनफोर्ड (चौथे पंच).
२६ मार्च : भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया (सिडनी), रंजन मदुगुले (मॅच रेफरी), कुमार धर्मसेना, रिचर्ड केटलब्रा (मैदानी पंच), मराइस इरासमस (थर्ड अम्पायर), रिचर्ड इलिंगवर्थ (चौथे पंच). (वृत्तसंस्था)