फलंदाजीदरम्यान धवनने फोडला लॅपटॉप....
By admin | Published: April 16, 2017 03:13 PM2017-04-16T15:13:58+5:302017-04-16T15:13:58+5:30
आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईटराडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीत सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 16 - आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईटराडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीत सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला. या लढतीत हैदराबादचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन विशेष चमक दाखवू शकला नाही. पण या लढतीमधील धवनचा एक फटका मात्र सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरला. हैदराबादच्या डावातील दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर धवनने थर्ड मॅनच्या दिशेने एक जोरदार फटका मारला. त्यावेळी चेंडू थेट सनरायझर्सच्या डगआऊटच्या दिशेने गेला. हा चेंडू डगआऊटमध्ये खेळाचे विश्लेषण करत असलेल्या विश्लेषकाच्या लॅपटॉपवर जाऊन बसला. या फटक्याचा जोर एवढा होता की चेंडू आदळल्याबरोबर लॅपटॉपचे काम तमाम झाले.
डावाच्या सुरुवातीला शिखर धवनने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट थर्डमॅनवरून टोलवला. कोलकाता नाईटरायडर्सने थर्डमॅनवर क्षेत्ररक्षक तैनात केलेला नसल्याचे चेंडू थेट सीमापार गेला. चेंडू आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यावर सनरायझर्सच्या डगआऊटमध्ये बसलेल्या विश्लेषकाची भंबेरी उडाली. चेंडू आपल्यावर आदळणार असल्याच्या भीतीने हा विश्लेषक मागे सरकला. तेवढ्यात चेंडू लॅपटॉपवर आदळला. या फटक्याने लॅपटॉपच्या स्क्रीनचे नुकसान झाले. तसेच लॅपटॉप बंद पडला. या प्रकारामुळे व्ही. व्ही. एस. लक्ष्मण त्या विश्लेषकांवर फार नाराज झाला.
या लढतीत रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या दहाव्या पर्वात शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव करीत, सलग दुसरा विजय नोंदवला.
सामनावीर उथप्पाच्या (६८) अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआर संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा डाव निर्धारित २० षटकांत ६ बाद १५५ धावांत रोखला.
#ShikharDhawan destroys tactical laptop, fuming SRH coach VVS Laxman rips apart analyst https://t.co/ESScAOnSy3
— aSaintLostInWar ©™ (@sandeepbaliga) April 15, 2017