धवनची कमाई कोहलीपेक्षा जास्त

By admin | Published: June 9, 2017 04:07 AM2017-06-09T04:07:52+5:302017-06-09T04:07:52+5:30

बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मिळणाऱ्या करमुक्त मानधनात तो मागे पडला आहे.

Dhawan earns more than Kohli | धवनची कमाई कोहलीपेक्षा जास्त

धवनची कमाई कोहलीपेक्षा जास्त

Next

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार प्रायोजनातून मिळणाऱ्या रकमेत सर्वांच्या पुढे असला तरी बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मिळणाऱ्या करमुक्त मानधनात तो मागे पडला आहे. २०१५-१६ या मोसमात दिल्लीचा सहकारी आणि टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा कोहलीपेक्षा वरचढ ठरला. बीसीसीआयने २५ लाखापेक्षा अधिक मानधन मिळणाऱ्या खेळाडूंची यादी वेबसाईटवर प्रकाशित केली. त्यानुसार धवनला वर्षभरासाठी ८७.७६ लाख तर कोहलीला ८३.०७ लाख इतकी रक्कम मिळाली. या यादीत सर्वाधिक करमुक्त रक्कम मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेला ८१.०६ लाख मिळाले.
रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मा यांना प्रत्येकी ७३.०२ लाख रुपये मिळाले असून दोघेही संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
वरुण अ‍ॅरोन याला सर्वांत कमी म्हणजे ३२.१५ लाख रुपये मिळाले. सर्वच खेळाडूंना मागच्या मोसमात न्यूझीलंड, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक सामन्यात खेळल्याबद्दल मॅचफिस देण्यात आली आहे. याशिवाय बीसीसीआयकडून घोषित रोख पुरस्कार तसेच आयसीसीकडून कसोटी रँकिंगसाठी मिळालेल्या बक्षिसाचा वाटा देखील देण्यात आला. ही सर्व रक्कम करमुक्त आहे. डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याला २०१६ च्या आयपीएल सत्रात जखम झाली होती. त्यासाठी त्याला १ कोटी ५२ लाख रुपये भरपाई म्हणून मिळाले.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या बीसीसीआय प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी यांच्यासह पाच महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयने एकरकमी लाभांश म्हणून प्रत्येकी ३० लाख रुपये दिले आहेत.
अन्य चार खेळाडूंमध्ये अंजूम चोप्रा, नीतू डेव्हिड, शुभांगी कुलकर्णी आणि सुधा शाह यांचा समावेश आहे. बीसीसीआयने बेंगळुरु येथे एनसीएसाठी जमीन खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Dhawan earns more than Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.