मनीष पांडेला संघात घेण्यावरुन धोनी आणि रवी शास्त्रींमध्ये फिस्कटलं

By admin | Published: March 30, 2016 02:01 PM2016-03-30T14:01:58+5:302016-03-30T14:01:58+5:30

युवराज सिंगच्या जागी संघात कोणाला स्थान द्यायचं यावरुन कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यात फिस्कटलं आहे

Dhoni and Ravi Shastri are in trouble after taking Manish Pandey into the squad | मनीष पांडेला संघात घेण्यावरुन धोनी आणि रवी शास्त्रींमध्ये फिस्कटलं

मनीष पांडेला संघात घेण्यावरुन धोनी आणि रवी शास्त्रींमध्ये फिस्कटलं

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ३० - टी-20 वर्ल्डकपमधील सेमी फायनलआधीच युवराज सिंगला दुखापतीमुळे बाहेर जावं लागल्याने भारतीय क्रिकेट संघाला अगोदरच धक्का बसला असताना आता युवराज सिंगच्या जागी संघात कोणाला स्थान द्यायचं यावरुन कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यात फिस्कटलं आहे. संघात नेमक कोणाला स्थान द्यायचं यावरुन दोघांमध्ये मतभेद असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
 
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार कप्तान महेंद्रसिंह धोनी युवराजच्या जागी पवन नेगीचा समावेश करण्याला पसंती दिली आहे. मात्र रवी शास्त्री अजिंक्य रहाणेला खेळवू इच्छित आहेत. युवराज सिंगला दुखापत झाल्यानंतर  भारतीय संघ व्यवस्थापनाने मनीष पांडेला बोलावल्यामुळे त्यालाच खेळवलं जाईल अशी माहिती मिळीली होती. विराट कोहलीनेदेखील मनीष पांडेलाच पसंती दिल्याचं कळत आहे. 
मात्र सुरु असलेल्या या वादामुळे नेमकं कोणाला खेळवलं जाईल ? याबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचं दिसून येतं आहे. गुरुवारी 31 मार्चला वानखेडे मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सेमी फायनल सामना होणार आहे. 
 

Web Title: Dhoni and Ravi Shastri are in trouble after taking Manish Pandey into the squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.