धोनीने दिले चोख प्रत्युत्तर

By admin | Published: October 26, 2016 12:54 AM2016-10-26T00:54:41+5:302016-10-26T00:54:41+5:30

बिहारचे माजी कर्णधार व देशातील सर्वोत्तम क्युरेटर दलजितसिंग यांनी मोहाली सामन्यात वन-डेसाठी चांगली खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर चेंडू ज्या वेगाने येत होता;

Dhoni gave an apt reply | धोनीने दिले चोख प्रत्युत्तर

धोनीने दिले चोख प्रत्युत्तर

Next

- सुनील गावसकर लिहितो़...

बिहारचे माजी कर्णधार व देशातील सर्वोत्तम क्युरेटर दलजितसिंग यांनी मोहाली सामन्यात वन-डेसाठी चांगली खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर चेंडू ज्या वेगाने येत होता; त्यामुळे फलंदाजांना सहज खेळता येत होते. खेळपट्टीवर हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाज व मनगटाच्या बळावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना विकेट घेण्यास मदत मिळाली. त्यामुळेच लेग स्पिनर अमित मिश्राला रॉस टेलर व ल्युक रोंची यांच्यासारख्या फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवता आला.
धर्मशाला व दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर फलंदाजांनी आपल्या चुकीमुळे विकेट बहाल केल्या. मोहालीमध्ये टॉम लॅथम व रॉस टेलर यांच्या चांगल्या फलंदाजीनंतर जिम्मी निशाम व मॅट हेन्री यांनी नवव्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी करून येथे मोठी खेळी करणे शक्य असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या चमकदार खेळीमुळे न्यूझीलंडने सन्मानजक धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांना काही करण्याची संधी मिळवून दिली. पाहुण्यांनी दिल्लीमध्ये यजमान संघाला २३६ धावांत रोखले होते. जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती, तर मोहालीमध्येही संघाला विजय मिळविण्याची संधी होती. क्रिकेट रंगतदार खेळ आहे, याची प्रचिती स्लिपचा स्पेशालिस्ट क्षेत्ररक्षक रॉस टेलरने विराट कोहलीचा एक सोपा झेल सोडल्यानंतर आली. भारतीय उपकर्णधाराने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेऊन कर्णधार धोनीच्या साथीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने शतकी खेळीदरम्यान आकर्षक फटके मारले. विराटच्या शतकी खेळीनंतर टेलरसाठी केवळ सहानुभूती व्यक्त करता येईल.
धोनीने मोहालीत शानदार खेळी करून आपल्या स्थानाबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबत त्याने टीकाकारांनाही गप्प केले. दरम्यान, अशा बाबीचा भारतीय कर्णधारावर काही प्रभाव पडत नाही आणि अनुभवाच्या जोरावर संघाला निर्धारित लक्ष्य गाठून देण्यात यशस्वी ठरतो. सलामी जोडीचे अपयश भारतीय संघासाठी सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत या जोडीला संघाला अपेक्षित यश मिळवून देता आलेले नाही. नव्या चेंडूने पांड्याला मोहालीमध्ये छाप सोडता आली नाही, यादवने चांगला मारा केला तर केदार जाधवने बळी घेऊन धोनीच्या चाणाक्ष कर्णधारपदाची प्रचिती दिली. खेदाची बाब ही आहे, की जे दुसऱ्याकडून निर्देश घेतात आणि कर्णधारपदाबाबत काही माहिती नसते ते धोनीला कर्णधारपदावरून हटविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच म्हटले जाते, की मेरा भारत महान ! (पीएमजी)

Web Title: Dhoni gave an apt reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.