धोनीला बाईक राईड पडली महागात, ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

By Admin | Published: April 8, 2015 10:34 AM2015-04-08T10:34:12+5:302015-04-08T11:03:26+5:30

बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने ट्रॅफिक पोलिसांनी महेंद्रसिंग धोनीला दंड ठोठावला आहे.

Dhoni gets bicycle rider, traffic police tort | धोनीला बाईक राईड पडली महागात, ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

धोनीला बाईक राईड पडली महागात, ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. ८ - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बाईकप्रेम तर सर्वांनाचा माहीत आहे, मात्र रांचीच्या रस्त्यावरून केलेली बुलेटराईड त्याला महागात पडली आहे. बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला आहे. 
चार महिन्यांचा परदेश दौरा, विश्वचषक स्पर्धा या सर्वानंतर धोनी ब-याच काळाने घरी परतला. त्यानंतर तो रांची शहरात त्याच्या हिरव्या रंगाच्या बुलेटवरून फिरत होता, त्याचे फोटो मीडियातही प्रसिद्ध झाले. मात्र त्याच्या बुलेटच्या पुढील बाजूला नंबर प्लेट नव्हती. बाईकचा नंबर मडगार्डवर लिहीण्यात आला होता. हे लक्षात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलयाचे सांगत पोलिसांनी त्याला ४५० रुपयांचा ठोठावला. दंडाची पावती घरी पाठवून दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Dhoni gets bicycle rider, traffic police tort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.