एकाही अर्धशतकाशिवाय धोनीच्या टी २० मध्ये एक हजार धावा
By admin | Published: March 24, 2016 06:43 PM2016-03-24T18:43:37+5:302016-03-24T18:43:37+5:30
भारत-बांगलादेश सामन्यात कर्णधारधार धोनीने टी २० विश्वचषकात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. धोनीला ही कामगीरी करताना एकही अर्धशतक झळकावता आले नाही हे विशेष आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - भारत-बांगलादेश सामन्यात कर्णधारधार धोनीने टी २० विश्वचषकात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. धोनीला ही कामगीरी करताना एकही अर्धशतक झळकावता आले नाही हे विशेष आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. एक हजार धावा पुर्ण करण्यासाठी धोनीला ६६ सामने खेळावे लागले. ६६ सामन्यात ५८ डावात फलंदाजीकरताना ३४.७५च्या सरासरीने १००८ धावा त्याने केल्या आहेत. ६६ सामन्यात २९ वेळा नाबाद राहण्याचा पराक्रम त्याने केला आहे. ५८ डावात फलंदाजी करताना ६७ चौकार आणि ३२ षटकार त्याने लगावले आहे. तर विकेटकिपींग करताना ३७ जणांना झेलबाद केले आणि २० जणाला स्टपिंग आऊट केलं.
भारतातर्फे टी २० मध्ये १००० धावा पुर्ण करणारा धोनी पाचवा फलंदाज ठरला आहे. यापुर्वी सिक्सर किंग युवराज सिंह, विराट कोहली, रोहित शर्मो आणि सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे.