‘क्रिकेटविश्वात धोनीवर दिग्गजांकडून स्तुतीसुमने’
By admin | Published: January 6, 2017 01:02 AM2017-01-06T01:02:37+5:302017-01-06T01:02:37+5:30
मायकेल क्लार्क ते रोहित शर्मा असे दिग्गज क्रिकेटपट ू ज्याचे ‘फॅन’ आहेत त्या महेंद्रसिंग धोनीने वन-ड,े तसेच टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडले.
नवी दिल्ली : मायकेल क्लार्क ते रोहित शर्मा असे दिग्गज क्रिकेटपट ू ज्याचे ‘फॅन’ आहेत त्या महेंद्रसिंग धोनीने वन-ड,े तसेच टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. हा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. भारताच्या या सर्वांत यशस्वी कर्णधाराच्या कर्तृत्वाची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉन म्हणाला,‘ धोनी सर्वकालीन महान कर्णधारांपैकी एक आहे. शानदार कर्णधार म्हणून त्याचे अभिनंदन!’
अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनीही माहीचे कौतुक केले. रहाणे म्हणाला, ‘प्रोत्साहनासाठी धन्यवाद! आपल्या नेतृत्वात बरेच शिकायला मिळाले. माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कर्णधाराचा शतश: आभार. संघाप्रती विजयी लक्ष्य ठेवून सर्वोत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा देणारी व्यक्ती तुझ्यात दिसली.’
रोहित शर्मा लिहितो, ‘धोनीने माझ्यासह अनेक खेळाडूंच्या करिअरमध्ये ठसा उमटविला आहे. धोनीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत माझ्याकडून सलामी करून घेतली. मला तुझी उणीव जाणवेल.’
फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा म्हणाला, ‘एक कर्णधार या नात्याने तुझी कामगिरी कुणी विसरू शकणार नाही. क्रिकेटमधील नवे मापदंड स्थापन केल्याबद्दल धन्यवाद.’ मोहम्मद कैफ म्हणाला, ‘नऊ वर्षे नेतृत्व करीत अनन्यसाधारण निकाल देणाऱ्या धोनीच्या कामगिरीला सलाम!’
तुझ्यासारखा कर्णधार लाभला हे भारतीय क्रिकेटचे नशीबच!’ इरफान पठाण म्हणाला, ‘कर्णधार म्हणून धोनीचे यश सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्याची कामगिरी त्याच्या यशाचा आलेख सादर करते.’
धोनीवर बनलेल्या चित्रपटाचा नायक सुशांतसिंग राजपूत म्हणाला, ‘तुझ्यासारखा तूच! कोट्यवधी लोकांच्या गळ्यातील ताईत असलेली ही व्यक्ती जमिनीवर आहे, हेच त्याच्या यशाचे गमक असावे. सलाम माझ्या कर्णधारा...!’
एम. एस. धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार होऊन निवृत्त झाला. तो महान आहे. अद्यापही भारतीय क्रिकेटला बरेच काही देण्याची क्षमता त्याच्या खेळात आहे. विराटला तिन्ही प्रकारांत नेतृत्व सोपविण्याची वेळ जवळ आली. - मायकल क्लार्क
भारतीय संघाच्या जडणघडणीत धोनीचे मोठे योगदान आहे. तो महान कर्णधार तर आहेच, पण जगातील क्रिकेटपटूंचे प्रेरणास्थानही आहे. - शाहीद आफ्रिदी
धोनी, भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार. त्याने स्वप्न सत्यात उतरविले. अनेकांना स्वप्ने पाहण्यास आणि ते साकार करण्यास प्रेरित केल्याबद्दल आभार. - सुरेश रैना