धोनी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज

By admin | Published: September 19, 2015 10:19 PM2015-09-19T22:19:49+5:302015-09-19T22:19:49+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० व वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती रविवारी संघाची निवड करणार आहे.

Dhoni is ready for limited overs matches | धोनी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज

धोनी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज

Next

द. आफ्रिकेविरुद्ध मालिका : भारतीय टी-२०, वन-डे संघाची निवड आज

बेंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० व वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती रविवारी संघाची निवड करणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांची नजर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर राहणार आहे. निवड समिती टी-२० मालिका व पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी संघाची निवड करण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या दौऱ्याची सुरुवात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. त्यामुळे धोनी व निवड समितीचे लक्ष पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेवर राहणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा दुय्यम दर्जाचा संघ गेला होता. या संघात सात अव्वल खेळाडूंचा समावेश नव्हता. आता धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे सर्व खेळाडू फिट आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना सीनियर खेळाडूंसाठी स्थान निर्माण करून द्यावे लागेल.
सलामीवीर शिखर धवनची दुखापत केवळ चिंतेचा विषय आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याची फिटनेस चाचणी अद्याप झालेली नाही. कसोटी स्पेशालिस्ट
सलामीवीर मुरली विजयची
झिम्बाब्वे दौऱ्यातील कामगिरी समाधानकारक होती. मर्यादित षटकांच्या समान्यांत तो उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी ठरत असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये धोनीने अजिंक्य रहाणेच्या तुलनेत अंबाती रायडूला झुकते माप दिले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारा केदार जाधव आणि मनीष पांडे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.
भारत ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी करणारा पंजाबचा गुरकिरत सिंग मान आणि कर्नाटकचा मयंक अग्रवाल यांच्यासारखे नवे चेहरे निवड होण्याच्या शर्यतीत असू शकतात. अश्विनची निवड होणे निश्चित असून, दुसरा फिरकीपटू म्हणून निवड समिती हरभजन सिंगला प्राधान्य देते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाचा विचार करता आला नव्हता. पण यावेळी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाजीमध्ये ईशांत शर्माला संधी मिळाली, तर तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
ईशांतवर एका कसोटी सामन्याची बंदी आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमार यांच्यावर धोनीचा विश्वास असून, धवल कुलकर्णीचा पर्यायी गोलंदाज म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे. वरुण अ‍ॅरोन व उमेश यादव अनेकदा चुका करतात. पण भविष्यात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा विचार करता त्यांना या मालिकेत संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhoni is ready for limited overs matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.