धोनी, रोहित, युवराज सलग सहाव्यांदा खेळणार

By admin | Published: February 24, 2016 03:47 AM2016-02-24T03:47:21+5:302016-02-24T03:47:21+5:30

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, युवराज सिंग यांच्यासह १९ खेळाडू सलग सहाव्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतील.

Dhoni, Rohit, Yuvraj will play for six consecutive times | धोनी, रोहित, युवराज सलग सहाव्यांदा खेळणार

धोनी, रोहित, युवराज सलग सहाव्यांदा खेळणार

Next

मिरपूर : भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, युवराज सिंग यांच्यासह १९ खेळाडू सलग सहाव्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतील. तसेच भारताच्या झूलन गोस्वामी आणि मिताली राजसह २९ महिला क्रिकेटपटू या स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या स्पर्धेत बांग्लादेश संघाचे पाच खेळाडू असे आहेत, जे सलग पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळले आहेत. त्यात मशरफी बिन मूर्तझा, शाकिब अल हसन, तमीम इक्बाल, महमुदुल्लाह, मुशफिकूर रहमान यांचा समावेश आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज या संघातील तीन-तीन खेळाडू मागच्या स्पर्धांमध्ये खेळले आहेत. या स्पर्धा द. आफ्रिका, इंग्लंड, विंडीज, श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये पार पडल्या होत्या. विंडीजकडून ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल, दिनेश रामदीन यांचा समावेश आहे. न्यूझीलंडचे नॅथन मॅक्युलम, रॉस टेलर, आफ्रिकेचे डीव्हीलियर्स, जे. पी. ड्युमिनी, लंकेचे तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा, पाकचा शाहीद आफ्रिदी, आॅस्ट्रेलियाचा वॉटसन हे खेळाडू सलग सहाव्यांदा टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. महिलांच्या विश्व टी-२० मध्ये विंडीज संघात ६ खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर, मेरिसा एगुलेरिया, डियांड्रा डोटिन, स्टेसी एन किंग, अनिसा मोहम्मद, शकिरा सेलमन या खेळाडू सर्व स्पर्धांमध्ये खेळल्या आहेत.

Web Title: Dhoni, Rohit, Yuvraj will play for six consecutive times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.