धोनी नियम
By admin | Published: March 28, 2015 01:43 AM2015-03-28T01:43:47+5:302015-03-28T01:43:47+5:30
चार क्षेत्ररक्षकांच्या नियमात बदल व्हावा : धोनी
Next
च र क्षेत्ररक्षकांच्या नियमात बदल व्हावा : धोनीमेलबर्न : वन डे क्रिकेटमध्ये चार क्षेत्ररक्षकांचा नियम फलंदाजधार्जिणा असल्यामुळे या नियमात बदल करण्याची मागणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केली आहे.काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत धोनीचा संघर्ष पाहायला मिळाला. पाचवा गोलंदाज रवींद्र जडेजा याला त्याने पाचारण केले, पण तोदेखील फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखू शकला नव्हता. ३० यार्डबाहेर चारपेक्षा अधिक क्षेत्ररक्षक उभे करण्याची परवानगी नसल्यामुळे भारतीय गोलंदाजीला फटका बसल्याचे धोनीने वारंवार म्हटले आहे. तो म्हणाला, 'माझे वैयक्तिक मत असे, की हा नियम बदलण्यात यावा. क्रिकेट इतिहासात आम्ही द्विशतक पाहिले नव्हते. पण गेल्या तीन वर्षांत सहा द्विशतकांची नोंद झाली. भारताकडून चार द्विशतक नोंदली गेली. त्यात रोहितने दोन व सचिन आणि सेहवागने एकेक द्विशतक ठोकले आहे. याशिवाय विंडीजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल यांनीदेखील प्रत्येकी एक द्विशतक झळकविले.'आयसीसीच्या नियमांवर नेम साधून धोनी म्हणाला, 'अनेक जण विचार करतात की अतिरिक्त क्षेत्ररक्षक आत असल्यामुळे निर्धाव चेंडू टाकले जाऊ शकतात. असे असेल तर सर्व ११ खेळाडू ३० यार्डमध्ये उभे करायला हरकत नाही. वन डे क्रिकेट केवळ चौकार-षटकारांचा खेळ झाल्यास लोकांना नकोसा होईल. चाहते कंटाळतील. १५ ते ३५ व्या षटकात फलंदाजी कशी होते ही वन डे क्रिकेटपुढील आव्हान असावे.'०००००