धोनीला चौथ्या स्थानावरच खेळवा : गांगुली

By Admin | Published: October 28, 2016 01:25 AM2016-10-28T01:25:25+5:302016-10-28T01:25:25+5:30

महेंद्रसिंह धोनी याने चौथ्या स्थानावरच फलंदाजीसाठी यायला हवे. असे केल्यास तो आणि विराट कोहली फिनिशरची भूमिका वठवू शकतात, असा सल्ला माजी कर्णधार

Dhoni should play fourth place: Ganguly | धोनीला चौथ्या स्थानावरच खेळवा : गांगुली

धोनीला चौथ्या स्थानावरच खेळवा : गांगुली

googlenewsNext

कोलकाता : महेंद्रसिंह धोनी याने चौथ्या स्थानावरच फलंदाजीसाठी यायला हवे. असे केल्यास तो आणि विराट कोहली फिनिशरची भूमिका वठवू शकतात, असा सल्ला माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिला आहे.
धोनी चौथ्या स्थानावर खेळल्यास सामना संपविणे त्याच्यासाठी सोयीचे ठरेल. फिनिशरचा अर्थ त्याने ४०व्या षटकापासून फलंदाजी करावी, असा नव्हे. विराट तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येतो. फिनिशरने तळाच्या स्थानावर खेळायला हवे, हा विचारच चुकीचा आहे. धोनीने चौथ्या स्थानावर खेळून देशाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. रांची येथे काल विराटने ४५ धावा ठोकल्या, तरीही भारत पराभूत झाला. यावर गांगुली म्हणाला, ‘‘भारताने कोहलीवर अधिक विसंबून राहू नये.’’

Web Title: Dhoni should play fourth place: Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.