धोनी, विराट आणि सौरवमध्ये हे आहेत समान गुण
By admin | Published: June 16, 2017 03:21 PM2017-06-16T15:21:12+5:302017-06-16T15:21:46+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे. फलंदाज म्हणून संघाच्या विजयात त्यांचे जितके योगदान आहे तितकेच कर्णधार म्हणून भारतीय संघाच्या उभारणीत या तिघांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या तीन महान फलंदाजांमध्ये कर्णधार म्हणून काही समान गोष्टी आहेत. जाणून घेऊया काय आहेत समान गोष्टी.
- सौरव गांगुलीपासून ख-या अर्थाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाली. सौरवने टीम इंडियामध्ये जिंकण्याची जिद्द, आक्रमकता निर्माण केली. कर्णधारपदी असताना सौरवने विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा आणि एमएस धोनी या युवा क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा दिला. एखाद-दुस-या खराब परफॉर्मन्समुळे त्यांना संघातून डच्चू दिला नाही. परिमाणस्वरुप आज हे सर्व खेळाडू वर्ल्डक्लास प्लेयर्स म्हणून ओळखले जातात.
- एमएस धोनी आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा हाच गुण आहे. 2011 वर्ल्डकप नंतर धोनीने नव्याने संघ बांधला. त्याने रविंद्र जाडेजा, आर.अश्विन यांना वारंवार संधी देऊन आत्मविश्वास निर्माण केला. एमएस धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळी विराटला एक तरुण संघ मिळाला. विराटही आज त्याचप्रमाणे केदार जाधव, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यावर विश्वास ठेवत आहे.
- 1999 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीने 183 धावांची विक्रमी खेळी केली. वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम इनिंग्जपैकी एक आहे. चामिंडा वास, मुरलीधरन या लंकेच्या अव्वल गोलंदाजाचा सौरवने अक्षरश कचरा केला होता.
- सौरव प्रमाणेच धोनीनेही 2005 साली श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये नाबाद 183 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेचे 299 धावांचे लक्ष्य गाठताना 15 चौकार आणि 10 षटकार लगावले होते.
- 2012 साली आशियाकपमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी केली होती. विराटच्या 183 धावांच्या खेळीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला.
- धोनीच्या तुलनेत सौरव आणि विराट प्रचंड आक्रमक आहेत. आक्रमकता जसा दोघांना प्लसपॉईंट आहे तसेच शांतपणा धोनींचा प्लसपॉईंट आहे. संघाला गरज असताना तिघांनी नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
- सौरव आणि विराट नेहमीच प्रतिस्पर्ध्यांच्या शाब्दीक बाचबाचीला पुरुन उरले आहेत.