...तेव्हा धोनी स्वत:च स्वीकारेल निवृत्ती - हेडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:46 PM2017-07-19T12:46:40+5:302017-07-19T13:06:02+5:30
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघातील धोनीचा सहकारी मॅथ्यू हेडन याने धोनीच्या निवृत्तीवरून विरोधकांना टोला लगावला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई. दि. 19 - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकत आपले लक्ष केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर केंद्रीत केले आहे. फलंदाजी आणि यष्टीरक्षणात त्याची कामगिरी युवा खेळाडूंना तोडीस तोड होत आहे. मात्र तरीही त्याला निवृत्तीचे सल्ले देणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट बाकी असून, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तो स्वत:च क्रिकेटपासून दूर जाईल, असे सांगत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघातील धोनीचा सहकारी मॅथ्यू हेडन याने धोनीच्या विरोधकांना टोला लगावला आहे.
तामिळनाडू क्रिकेट लीगच्या प्रसिद्धीसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या हेडनला त्याचा संघसहकारी आणि अव्वल यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने ज्याप्रमाणे एक झेल सुटल्यावर निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे धोनीही निवृत्ती स्वीकारणार का असे विचारण्यात आले. त्यावेळी हेडन म्हणाला, " पाण्याच्या ग्लासात नाणी टाकत जावी तसे क्रिकेटपटूचे जीवन असते. त्यात अशी एक वेळ येते जेव्हा एक अजून नाणे टाकले की पाणी बाहेर येते. गिलख्रिस्ट असाच खेळाडू होता. त्याचप्रमाणे धोनीला जेव्हा वाटेल की आता निवृत्ती स्वीकारण्याची वेळ आली आहे. तेव्हा तो स्वत:च निवृत्तीचा निर्णय जाहीर करेल., पण एक खेळाडू म्हणून अद्यापही तो सामन्याचा निकाल बदलवू शकतो."
अधिक वाचा
( वॉर्नर, गेल, पोलार्ड आणि धोनीला बदलावी लागणार "बॅट" )
( ‘तो’ निर्णय धोनीलाच घेऊ द्या : साहा )
( Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी )
अधिक वाचा
( वॉर्नर, गेल, पोलार्ड आणि धोनीला बदलावी लागणार "बॅट" )
( ‘तो’ निर्णय धोनीलाच घेऊ द्या : साहा )
( Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी )
यावेळी हेडनने विराट कोहलीच्या कप्तानीबाबतही आपले मत मांडले. "विराट कोहली भारतीय संघाचे भविष्य आहे. मला त्याची आक्रमकता भावते. तो असा खेळाडू आहे जो कोणत्याही मोठ्या सामन्यात आपली कामगिरी, नेतृत्व क्षमता आणि खेळाविषयीच्या ज्ञानाची चुणूक दाखवी शकतो. हे गुण त्याला असा खेळाडू बनवतात ज्याच्यावर विश्वास टाकता येऊ शकेल." असे हेडनने सांगितले.
बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी
आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे पुढील हंगामात स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. आता स्पर्धेत पुनरागमन करताना संघाची ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या संघात हवा आहे. परवानगी मिळाल्यास धोनीला संघात कायम ठेवण्याचा चेन्नई सुपरकिंग्जचा प्रयत्न आहे.