आयपीएलच्या या टीमचा धोनी कॅप्टन, आर अश्विनही संघात
By admin | Published: May 21, 2017 08:14 AM2017-05-21T08:14:15+5:302017-05-21T08:14:15+5:30
आयपीएल अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. आज जेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - आयपीएल अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. आज जेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. दरम्यान क्रिकेटची अग्रगण्य वेसबाइट ESPN CRICKETINFO ने आयपीएलच्या सर्वकालीन 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.
ESPN CRICKETINFO ने या संघासाठी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कर्णधारपदासाठी निवड केली आहे. या टीममध्ये विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल याचीही निवड करण्यात आली आहे. याशिवाय भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, आश्चर्यकारकपणे या संघातून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला डावलण्यात आलं आहे. डिव्हिलियर्सची कामगिरी आय़पीएलच्या यंदाच्या सत्रात खराब झाली होती.
जलद गोलंदाजांमध्ये या संघात भुवनेश्वर कुमार आणि लसिथ मलिंगाला जागा देण्यात आली आहे. तर आर. अश्विन आणि सुनिल नारायणकडे फिरकीची धूरा देण्यात आली आहे. संघनिवडीच्या या पॅनलमध्ये 16 सदस्य आणि 5 माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता.
ही आहे ESPN CRICKETINFO ने निवडलेली टीम-
1- ख्रिस गेल, 2- वीरेंद्र सेहवाग, 3- विराट कोहली, 4- सुरेश रैना, 5- रोहित शर्मा, 6- एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), 7- ड्वेन ब्रावो, 8- सुनील नारायण, 9- आर अश्विन, 10- भुवनेश्वर कुमार, 11- लसिथ मलिंगा