2019 च्या वर्लकपमध्ये खेळण्यावर धोनीचा खुलासा
By admin | Published: March 23, 2017 07:34 PM2017-03-23T19:34:48+5:302017-03-23T19:34:48+5:30
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे.
ऑलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे. माझ्यातील खेळ अजून संपला नाही आपण कसोटीतून निवृत्ती किंवा कर्णधार पदावरून पायउतार झालो असलो तरी पुढील वर्ल्डकप सहज खेळू शकतो, असा विश्वास माजी कर्णधार धोनीने व्यक्त केला आहे. धोनीने एका प्रमोशलन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी तो बोलत होता.
पुढे बोलताना धोनी म्हणाला, क्रिकेटमधून केव्हा निवृत्ती घ्यावी लागेल याचा अंदाज आपण केव्हाच ठरवू शकत नाही. एखादी दुखापत देखील खेळाडूला निवृत्ती घेण्यास भाग पाडू शकते. सध्या 2017 सुरु आहे वर्ल्डकपसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी आहे. या दोन वर्षांत काय होईल हे आताच सांगता येणार नाही. पण सध्याचा माझा फिटनेस पाहता मी 2019 चा वर्ल्डकप आरामात खेळेन असा विश्वास माजी कर्णधार धोनीने व्यक्त केला. धोनीने नुकतेच झारखंड संघाचे नेतृत्त्व करताना विजय हजारे करंकडात उपांत्य फेरी गाठली होती.
वाढत्या वयासह धोनला जुन्या स्ट्राइक रेटने न खेळता येणे, हे नैसर्गिक आहे. मात्र, इच्छाशक्ती आणि खेळ समजण्याची क्षमता या जोरावर तो विशेष ठरतोय. चॅम्पियन ट्रॉफीआधी स्वत:ला लयीत राखण्यासाठी तो देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळत आहे. खेळाडू म्हणून त्याचे भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच ठरेल, असे वक्तव्य धोनीचे बालपणाचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी केलेले आहे.