धोनीचा खुलासा, "या" बॉलरचा सामना करणं सर्वात कठीण
By admin | Published: June 7, 2017 05:02 PM2017-06-07T17:02:48+5:302017-06-07T17:02:48+5:30
क्रिकेटच्या जगात बेस्ट फिनिशरमध्ये गणना होत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने पाणी पाजलं आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 7 - क्रिकेटच्या जगात बेस्ट फिनिशरमध्ये गणना होत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने पाणी पाजलं आहे. मात्र, लंडनमध्ये एका कार्यक्रमात त्याने आपल्या करिअरमध्ये कोणत्या गोलंदाजाचा सामना करणं अवघड होता याबाबत खुलासा केला आहे.
लंडनमध्ये सोमवारी भारतीय कर्णधार विराट कोहलीने एका चॅरिटी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत टीम इंडियाच्या सर्व खेळाडुंसह कोच अनिल कुंबळे आणि सपोर्ट स्टाफनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे होस्ट अॅलन विल्किन्स यांनी धोनीला करिअरमध्ये कोणत्या गोलंदाजाचा सामना करणं कठीण होतं असा सवाल केला. याचं उत्तर देताना धोनी म्हणाला, ""माझ्याकडे असलेल्य़ा मर्यादित टेकनिकमुळे सर्व प्रकारच्या जलद गोलंदाजांचा सामना करणं अवघड जातं, फास्ट बॉलरचा सामना करणं नेहमी कठीण असतं, पण मला जर एका गोलंदाजाचं नाव घ्यायचं असेल तर मी शोएब अख्तरचं नाव घेईल. यामागे साधं कारण आहे, तो खूप फास्ट बॉलिंग करायचा , तो यॉर्कर टाकू शकत होता, बाउन्सरही टाकायचा त्याच्याविरोधात खेळताना पुर्वानुमान लावणं कठीण असायचं त्यामुळे अख्तरविरोधात खेळताना मजा यायची"".
यावेळी विल्किन्स यांनी धोनीला डकवर्थ लुईस नियमाबाबतही प्रश्न विचारला. इतक्या वर्षांपासून क्रिकेट खेळतोय तर तुला डकवर्थ लुईस समजतो का असा सवाल त्यांनी केला. यावर मिश्किल उत्तर देताना स्वतः आयसीसीलाही हा नियम समजत असेल असं मला वाटत नाही असं धोनी म्हणाला.
पाकिस्तान विरोधातील विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून जस्टिस एंड केयर ऑर्गनाइजेशनला फंड(पैसे) गोळा करणे हा उद्देश होता. ही ऑर्गनाइजेशन मानवी तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करते.