धोनीची ‘पद्मभूषण’ तर विराटची ‘पद्मश्री’साठी शिफारस

By admin | Published: August 14, 2014 04:47 AM2014-08-14T04:47:43+5:302014-08-14T04:47:43+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़

Dhoni's 'Padma Bhushan' and Virat's 'Padmashri' recommendation | धोनीची ‘पद्मभूषण’ तर विराटची ‘पद्मश्री’साठी शिफारस

धोनीची ‘पद्मभूषण’ तर विराटची ‘पद्मश्री’साठी शिफारस

Next

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़ बीसीसीआयने अनुभवी फलंदाज विराट कोहली याचीही पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़
बीसीसीआयने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यासह महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिचीसुद्धा पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़ कर्णधार धोनीला २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते़ धोनीला पद्मभूषण मिळाल्यास तो हा पुरस्कार मिळविणारा भारताचा १० वा क्रिकेटपटू ठरेल़
कोहलीला गत वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे़ मात्र, सध्या इंग्लंड दौऱ्यावर त्याला अद्यापही सूर गवसला नाही़ (वृत्तसंस्था)

Web Title: Dhoni's 'Padma Bhushan' and Virat's 'Padmashri' recommendation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.