प्रत्येक मॅचनंतर स्टंप काढून नेण्यामागे धोनीचा रिटायर्डमेंट प्लान
By admin | Published: March 12, 2016 09:57 PM2016-03-12T21:57:50+5:302016-03-12T21:57:50+5:30
प्रत्येक क्रिकेट मॅच संपल्यानंतर स्टंप काढून नेण्यामागे माझा रिटायर्डमेंट प्लान असल्याची कबुली स्वत: भारतीय क्रिकेट संघाचा कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने दिली आ
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १२ - प्रत्येक क्रिकेट मॅच संपल्यानंतर स्टंप काढून नेण्यामागे माझा रिटायर्डमेंट प्लान असल्याची कबुली स्वत: भारतीय क्रिकेट संघाचा कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने दिली आहे. महेंद्रसिंग धोनी प्रत्येक क्रिकेट मॅच संपली की स्टंप काढून का नेतो ? हा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडलेला प्रश्न. यावरुन अनेक तर्क वितर्कदेखील लावले गेले. यामागचं नेमक कारण काय ? हे मात्र कोणालाच माहित नव्हत. अखेर धोनीने स्वत: यामागचा खुलासा केला आहे.
बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत धोनीने आपल्या या सवयीबद्दल सांगितलं आहे. 'हा माझा रिटायर्डमेंटचा प्लान आहे. मी जास्तीत जास्त स्टंप गोळा करतोय ही चांगली गोष्ट आहे, मात्र ते कोणत्या सामन्यातील आहेत हे मार्क करत नाही ही वाईट गोष्ट आहे. त्यामुळे मी निवृत्त झाल्यावर मी खेळलेल्या सगळ्या सामन्यांचे व्हिडिओ पाहणार. त्यात स्टंपवरील लोगो चेक करणार आणि स्टंप कोणत्या सामन्यातला आहे ते चेक करणार. निवृत्त झाल्यानंतरचा हा माझा वेळ घालवण्याचा छंद असेल', असं धोनीने या मुलाखतीत सांगितलं आहे.