धोनीची निवृत्ती धक्कादायक - विराट कोहली
By admin | Published: January 5, 2015 11:33 AM2015-01-05T11:33:30+5:302015-01-05T11:36:20+5:30
हेंद्रसिंग धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय संघासाठी अतिशय धक्कादायक होता अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ५ - महेंद्रसिंग धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय संघासाठी अतिशय धक्कादायक होता अशी प्रतिक्रिया देत भारतीय संघाचा नवा कर्णधार विराट कोहलीने अखेर या विषयावरील आपले मौन सोडले आहे. सिडनीमध्ये उद्ययापासून सुरू होणा-या अखेरच्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कोहलीने या विषयावर आपले मत मांडले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या कसोटीनतर महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता, त्यानंतर विराट कोहलीकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या जवळीकीमुळेच धोनीने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र कोहलीने त्यावर मौन बाळगणेच पसंत केले होते.
मात्र आजच्या पत्रकार परिषददेरम्यान पहिल्यांदाच तो या विषयावर बोलला. 'धोनीच्या निवृत्तीचा निर्णय आम्हा सर्वांसाठीच धक्कादायक होता. तिस-या कसोटीनंतर आम्हीसामान पॅक करत होतो, तेव्हाच धोनीने त्याचा निर्णय जाहीर केला. आम्हाला हे अनपेक्षित होतं, त्यामुळे त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळलं नाही. त्याच्या निर्णयामुळे आम्ही अक्षरश: स्तब्ध झालो असे कोहली म्हणाला. धोनीप्रमाणेच आमच्यासाठीही तो भावनिक क्षण होता, असेही त्याने सांगितले.