ध्यानचंद जोड
By Admin | Published: December 25, 2014 10:41 PM2014-12-25T22:41:06+5:302014-12-25T22:41:06+5:30
सरकारने पाच भारतरत्न पदके तयार करण्याची ऑर्डर दिल्याने ध्यानचंद यांचे नाव नक्की येईल, असे वाटले होते. त्यावेळी वाजपेयी यांच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही नाव पुढे आले. इतकी पदके कशासाठी याचा वेध घेतल्यास पुन्हा तीन नावांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यात ध्यानचंद यांचे नाव नक्कीच येईल. क्रीडा मंत्रालयाने गतवर्षी देखील ध्यानचंद यांचेच नाव पुढे केले पण पीएमओने ऐनवेळी सचिनच्या नावाला प्राधान्य दिले.
स कारने पाच भारतरत्न पदके तयार करण्याची ऑर्डर दिल्याने ध्यानचंद यांचे नाव नक्की येईल, असे वाटले होते. त्यावेळी वाजपेयी यांच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही नाव पुढे आले. इतकी पदके कशासाठी याचा वेध घेतल्यास पुन्हा तीन नावांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यात ध्यानचंद यांचे नाव नक्कीच येईल. क्रीडा मंत्रालयाने गतवर्षी देखील ध्यानचंद यांचेच नाव पुढे केले पण पीएमओने ऐनवेळी सचिनच्या नावाला प्राधान्य दिले. ऑगस्ट महिन्यात भाजपच्या अनेक खासदारांनी ध्यानचंद यांना हा सन्मान मिळावा, अशी प्रतिक्रिया दिली. देशासाठी सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारे ध्यानचंद यांनी १९४८ साली निवृत्ती घेतली. चार वर्षानंतर त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांना आता हा पुरस्कार मिळणार नसेल तर क्रीडाप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखे होईल.(वृत्तसंस्था)..........................................................