ध्यानचंद यांच्या ‘भारतरत्न’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!
By Admin | Published: August 26, 2016 08:52 PM2016-08-26T20:52:10+5:302016-08-26T20:52:10+5:30
भारतीय हॉकीचे महान खेळाडू जगविख्यात मेजर ध्यानचंद यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यास होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भारतीय हॉकीचे महान खेळाडू जगविख्यात मेजर ध्यानचंद यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यास होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक माजी हॉकीपटू येथील जंतर मंतरवर २८
आॅगस्ट रोजी धरणे देणार आहेत.
मेजर ध्यानचंद यांचा २९ आॅगस्ट हा जन्मदिवस. हा दिवस भारतात राष्टÑीय क्रीडा दिन पाळला जातो. याच दिवशी राष्टÑपती राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार राष्टÑपती भवनात खेळाडूंना प्रदान करतात. मेजर ध्यान चंद
नॅशनल स्टेडियममध्येही त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
राज्यसभा सदस्य माजी हॉकी कर्णधार दिलीप तिर्की तसेच मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोककुमार यांच्यामते ध्यानचंद हे धरणे देणाºयांमध्ये प्रमुख असतील. अशोक म्हणाले,‘ ध्यानचंद यांच्याकडे सातत्याने डोळेझाक सुरू आहे.
याकडे आम्ही वारंवार लक्ष वेधले. यंदादेखील आम्ही जंतरमंतरवर धरणे देत या मुद्याकडे लक्ष वेधणार आहोत.
२०१३ च्या नोव्हेंबरमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा निवृत्त होताच त्याच दिवशी त्याला भारतरत्न देण्याची घोषणा झाली होती. सचिन भारत रत्न मिळालेला पहिला भारतीय खेळाडू बनला. ध्यानचंद यांच्या भारतरत्नची मागणी
मात्र त्याही पूर्वीपासून सुरूच आहे. सचिनला भारत रत्न दिल्यानंतर आता ध्यानचंद यांना हा सन्मान बहाल केला जाईल, अशी अपेक्षा होती पण संसद आणि संसदेबाहेरही वारंवार मागणी झाल्यानंतर ध्यानचंद यांच्याकडे सतत डोळेझाक
करण्यात येत आहे.
२८ ला जंतरमंतरवर होणाºया धरणे कार्यक्रमात दिलीप तिर्की, अशोक कुमार यांच्यासह जफर इक्बाल, अजितपालसिंग, महाराज कुमार कौशिक, एबी सुबय्या, मोहम्मद रियाझ, आशिष बल्लाळ, मुकेश कुमार आणि ए. के. बन्सल आदी सहभागी
होणार आहे. प्रख्यात वालुका शिल्पकार सुदर्शन पटनायक हे धरणे कार्यक्रमाचे आकर्षण असतील.(वृत्तसंस्था)