कमकुवत गोलंदाजी अनेक संघांची अडचण

By admin | Published: April 23, 2017 02:48 AM2017-04-23T02:48:14+5:302017-04-23T02:48:14+5:30

गुजरातने योग्यवेळी केकेआरचा पराभव करीत स्पर्धेत पुनरागमन केले. गेल्या मोसमात साखळी फेरीअखेर अव्वल स्थानावर असलेला लायन्स संघ यंदा साधारण गोलंदाजीमुळे

The difficulty of many teams weak bowling | कमकुवत गोलंदाजी अनेक संघांची अडचण

कमकुवत गोलंदाजी अनेक संघांची अडचण

Next

सुनील गावसकर लिहितात...

गुजरातने योग्यवेळी केकेआरचा पराभव करीत स्पर्धेत पुनरागमन केले. गेल्या मोसमात साखळी फेरीअखेर अव्वल स्थानावर असलेला लायन्स संघ यंदा साधारण गोलंदाजीमुळे संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. संघाची मुख्य ताकद फलंदाजी असून गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतरही लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकण्याची संधी असते, याची संघ व्यवस्थापनाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे शुक्रवारी ईडन गार्डन्सवर त्यांनी विजय नोंदवला.
प्रत्येक फ्रेन्चायजी संघांसाठी चौथ्या विदेशी खेळाडूची निवड करणे डोकेदुखी ठरले आहे. तीन खेळाडूंची ते सहज निवड करतात, पण चौथ्या खेळाडूची निवड करताना त्यांना अडचण भासत आहे. चौथा खेळाडू अष्टपैलू असावा की स्पेशालिस्ट गोलंदाज असावा, याबाबत त्यांच्या मनात साशंकता असते.
केकेआरविरुद्ध गुजरात संघव्यवस्थापनाने हॅट््ट्रिक घेणारा अँड्य्रू टायच्या स्थानी अनुभवी जेम्स फॉकनरला संधी दिली, पण माझ्या मते संघाचा समतोल साधण्यासाठी टायची निवड योग्य ठरली असती. बसिल थम्पी यॉर्कर व स्लोव्हरवनच्या जोरावर उपयुक्त ठरत आहे. ब्रॅन्डन मॅक्युलमसारख्या सिनिअर खेळाडूकडून युवा थम्पीला टिप्स मिळत असल्यामुळे त्याचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होत आहे. हे चांगले चित्र आहे. आयपीएलची ही विशेषता आहे. येथे अनोळखी भारतीय खेळाडूंना केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील सिनिअर खेळाडूंचे मार्गदर्शन मिळू शकते. जर गुजरातने थम्पी, टाय, फॉकनर व जडेजा यांच्यासह खेळण्याचा निर्णय घेतला तर त्यांना केवळ पाचव्या गोलंदाजाची चिंता भेडसावण्याची शक्यता आहे.
पंजाब संघाला गोलंदाजांची चिंता भेडसावत आहे. त्यांनी आपली आवड-निवड न जोपासता सर्वोत्तम संघ निवडण्यावर
भर द्यायला पाहिजे किंवा सातत्याने नाणेफेक जिंकून (अशक्य असलेली बाब) फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करण्यास सज्ज असायला हवे. हाशिम अमलाने शतकी खेळी केल्यामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले असेल. अमलाच्या मेहनतीचे
त्याच्या संघातील गोलंदाजांना चिज करता आले नाही.
गुजरात लायन्सविरुद्धच्या पराभवानंतर कोलकाता संघ पुन्हा विजय मार्गावर परतण्यास उत्सुक असेल. सुनील नरेनला सलामीला खेळण्याची रणनीती उपयुक्त ठरत आहे. कर्णधार गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करीत आहेत. केकेआरपुढे अन्य संघांप्रमाणे गोलंदाजी हा मोठा चिंतेचा विषय नाही. नरेनप्रमाणे उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे, पण कोल्टर नाईलच्या गोलंदाजीवर रैनाने खोऱ्याने धावा वसूल करीत सामना आपल्या बाजूने फिरवला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सध्या पिछाडीवर पडला आहे, पण दमदार पुनरागमन करण्याची क्षमता व कोहलीचा फॉर्म संघाची मुख्य ताकद आहे. अद्याप बऱ्याच लढती शिल्लक आहेत, पण बराच वेळ पिछाडीवर असणे धोक्याचा इशारा असल्याची सर्व संघांना कल्पना आहे. (पीएमजी)

Web Title: The difficulty of many teams weak bowling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.