शिस्त, समर्पणाचे प्रतीक अनिल कुंबळे
By admin | Published: June 24, 2016 01:09 PM2016-06-24T13:09:02+5:302016-06-24T13:10:41+5:30
अनिल कुंबळे ज्यावेळी खेळाडू होते त्यावेळी ते खेळाची पूर्ण माहिती राखणारे, दृढसंकल्प असणारे आणि चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असलेले खेळाडू या गुणामुळे ओळखले जात.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - अनिल कुंबळे ज्यावेळी खेळाडू होते त्यावेळी ते खेळाची पूर्ण माहिती राखणारे, दृढसंकल्प असणारे आणि चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असलेले खेळाडू या गुणामुळे ओळखले जात होते. आता प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांना कोहली अॅन्ड कंपनीकडून तशाच प्रकारच्या कामगिरी अपेक्षित आहे.
१९ वर्षांच्या अनिल कुंबळेने १९९० मध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळी त्याच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली नव्हती. कारण त्याच लढतीत १७ वर्षीय एका खेळाडूने आपल्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांपैकी पहिले शतक झळकावले होते, पण पुढचे दोन दशके भारतीय सचिन तेंडुलकरची मैदानावरील कामगिरीची प्रशंसा करीत असताना याच कालावधीत बेंगळुरूच्या सहा फूट तीन इंच उंची लाभलेल्या मेकॅनिकल इंजिनीअरलाही पूर्ण आदर मिळाला.
पराभूत संघाच्या कर्णधाराची देशातील मीडियाने प्रशंसा केली असे रोज घडत नाही. पण २००८ मध्ये कुंबळेने २००८ मध्ये सिडनीमध्ये ‘मंकी गेट’ कसोटीनंतर पत्रकार परिषदेत ‘केवळ एक संघ खिलाडूवृत्तीने खेळला’ असे वक्तव्य केल्यानंतर हे घडले होते. त्यावेळी कर्णधाराने मोठ्या भावाची भूमिका पार पाडली होती. त्या दिवसानंतर त्याच्याबाबतचा आदर आणखी वाढला.
सांगायला व ऐकायला थोडे वेगळे वाटत असले तरी कुंबळे तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. सचिनमध्ये त्याच्यात अनोखी प्रतिभा नव्हती किंवा सौरव किंवा व्हीव्हीएसप्रमाणे तो ‘गॉड गिफ्टेड’ खेळाडू नव्हता. पण समर्पण, शिस्त आणि प्रतिबद्धतता याची चर्चा केली तर या तीन खेळाडूंच्या तुलनेत तो कुठेच कमी नव्हता.
भागवत चंद्रशेखर यांच्या शहरातून आलेल्या या लेग स्पिनर अनिल कुंबळेवर सुरुवातीच्या कालावधीतच चेंडू अधिक वळवता येत नसल्याची टीका झाली. पण त्याने १८ वर्षांच्या कारकीर्दीत कसोटीमध्ये ६१९ तर वन-डेमध्ये ३३७ आंतरराष्ट्रीय बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजांमध्ये तो मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०९) यांच्यानंतर तिसºया क्रमांकावर आहे.
पाकिस्तानविरुद्ध फिरोजशाह कोटलावर त्याने ७४ धावांच्या मोबदल्यात घेतलेले १० बळी हा कुंबळेच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण होता. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने जबडा तुटला असताना गोलंदाजी करीत ब्रायन लाराला बाद केले होते. त्यावरून त्याच्या समर्पणाची कल्पना येते. भारताचे दोन सर्वांत यशस्वी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन व सौरव गांगुली नेहमी या विनम्र व मृदुभाषी व्यक्तीचे आभारी राहतील. अनिलच्या उपस्थितीत त्यांना सामना जिंकण्यासाठी कधी फिरकीपटूला अनुकूल खेळपट्टीचा गरज भासत नव्हती. तिसºया दिवसापासून चेंडू थोडाफार वळायला लागल्यानंतर उपखंडातील उसळी घेणाºया खेळपट्ट्यांवर कुंबळे उपयुक्त सिद्ध होत होता. फलंदाजीला सनथ जयसूर्या असो की सईद अन्वर असो चेंडू कुंबळेकडे सोपविणे हेच उत्तर असायचे. ब्रायन लारा किंवा नासिर हुसेन गोलंदाजावर वर्चस्व गाजवीत असताना अझहर व गांगुलीचा विश्वास केवळ कुंबळेवर असायचा.
प्रशिक्षक म्हणून कुंबळे कितपत यशस्वी ठरतो, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईलच. पण एक बाब मात्र स्पष्ट आहे ते म्हणजे त्याचे वर्तन. कुंबळेची रणनीती चांगली राहील, त्याचप्रमाणे त्याचे होमवर्कही अचूक असेल. त्याच्या उपस्थितीत कुठल्याही प्रकारची हयगय चालणार नाही, हे मात्र निश्चित.