सलामीवीर धवनच्या फिटनेसविषयी साशंकता

By admin | Published: January 21, 2017 05:00 AM2017-01-21T05:00:46+5:302017-01-21T05:00:46+5:30

शिखर धवनला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी येथे पोहोचल्यानंतर तत्काळ रुग्णालयात जावे लागले.

Dishonesty about fitness of opener Dhawan | सलामीवीर धवनच्या फिटनेसविषयी साशंकता

सलामीवीर धवनच्या फिटनेसविषयी साशंकता

Next


कोलकाता : खराब फॉर्ममध्ये असणारा भारतीय सलामीवीर शिखर धवनला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी येथे पोहोचल्यानंतर तत्काळ रुग्णालयात जावे लागले. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.
सूत्रानुसार धवनच्या हाताच्या अंगठ्याला त्रास होत आहे. आॅक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. स्थानिक अधिकाऱ्याने म्हटले, तो रेडिओलॉजी विभागात सल्ल्यासाठी गेला होता आणि तेथे तो एका तासापेक्षा जास्त वेळ होता.’’ धवन इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही वनडेत फ्लॉप ठरला. त्याने १ आणि ११ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे बेंचवर असल्यामुळे तसे पाहता त्याचे स्थानही धोक्यातच आहे.
धवनची दुखापत चिंतेचा विषय आहे आणि तो अखेरच्या लढतीत संघात स्थान मिळवतो अथवा नाही आणि त्याचबरोबर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतही आपले स्थान निश्चित करतो अथवा नाही हे पाहावे लागेल.

Web Title: Dishonesty about fitness of opener Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.