पार्थ तोष्णीवालला दुहेरी मुकुट रोटरी क्लबच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:39+5:302015-08-26T23:32:39+5:30

सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ तसेच प्रियांका गोब्बूर, पलक तोष्णीवाल, सुनील तोष्णीवाल हेदेखील बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटातून विजयी झाले़

District-level sports competition in Rotary Club of the double crown of Partha Toshniwal | पार्थ तोष्णीवालला दुहेरी मुकुट रोटरी क्लबच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

पार्थ तोष्णीवालला दुहेरी मुकुट रोटरी क्लबच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

Next
लापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ तसेच प्रियांका गोब्बूर, पलक तोष्णीवाल, सुनील तोष्णीवाल हेदेखील बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटातून विजयी झाले़
बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत प्रियांका गोब्बूर-रजनीता उदगिरी या जोडीने पलक तोष्णीवाल-रुपा सुराणा या जोडीवर मात केली़ पुरुष एकेरीत पार्थ तोष्णीवाल विजेता ठरला़ १५ वर्षांखालील पुरुष दुहेरीत पार्थ तोष्णीवाल-अथर्व तोष्णीवाल या जोडीने पराग चिट्याल-नागराज या जोडीवर विजय मिळवला़ मुलींच्या एकेरीत पलक तोष्णीवालने तेहरीन शेखवर मात केली़ पुरुष दुहेरीत सूरज तापडिया-श्रीकांत तापडिया या जोडीने शशांक कुलकर्णी-मन्मेश्वर कानडे या जोडीवर विजय मिळवला़
टेबल टेनिस स्पर्धेत सुनील तोष्णीवालने मिनेश बुरावर मात करीत विजेतेपद पटकावले़
क्रिकेट स्पर्धेत रोट्रॅक्स क्लब ऑफ मंदार इन्स्टट्यिूटने रोट्रॅक्स क्लब ऑफ सोलापूर सृजनवर मात केली़ तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ इस्टने रोटरी क्लब ऑफ मोडनिंबवर मात केली़
लॉन टेनिस स्पर्धेत हर्षा कन्ना-गौरव मदन या जोडीने दिनेश कारंजे-शैलेंद्र सुराणावर मात केली़ अनेटस् दुहेरीत अंकित हर्षा-प्रणव मोंढे या जोडीने खुशी सुराणा- रुपा मोंढे या जोडीवर विजय मिळवला़
या स्पर्धेचे उद्घाटन निर्वाचित रोटरी प्रांतपाल व्यंकटेश चन्ना यांच्या हस्ते झाले़ या स्पर्धेत बार्शी, सोलापूर, पंढरपूर, मोडनिंब, अक्कलकोट आदी भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़
या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी प्रांतपाल मोहन देशपांडे यांच्या हस्ते झाले़ प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ नॉर्थ इस्टचे अध्यक्ष पवन मोंढे यांनी तर आभारप्रदर्शन महेश सुधाकर यांनी केले़
यासाठी राकेश उदगिरी, नंदकुमार हबीब, डॉ़ चंदू लब्बा, संजीव मेंथे, डॉ़ सुमीत तंबाखे, दीपक चिंता, डॉ़ महादेव शिंदे, संजय बिराजदार, सदानंद चिंता, सुहास लाहोटी, रत्नाकर बिराजदार, मनोहर लोमटे, नित्यानंद गावकर यांनी परिश्रम घेतले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
सोलापुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेते खेळाडू़ चषकासोबत़

Web Title: District-level sports competition in Rotary Club of the double crown of Partha Toshniwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.