नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 07:45 PM2024-06-13T19:45:25+5:302024-06-13T19:46:01+5:30

नागपूरच्या दिव्या देशमुखने गांधीनगर येथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

Divya Deshmukh won the World Junior Chess Championship 2024 title in the girls section in Gandhinagar after beating Beloslava Krasteva of Bulgaria in the final round. | नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा

नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा

नागपूरच्या दिव्या देशमुखने गांधीनगर येथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने अंतिम फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव्हा क्रास्तेव्हाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. २७ देशांच्या १०१ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि दिव्या व क्रास्तेव्हा या दोघी ज्युनियर गर्ल फिडे रेटींमध्ये अव्वल तीनमध्ये सहभागी असलेले खेळाडू आहेत. 


आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने भारताच्याच साची जैनचा पराभव करून गुणांची संख्या ९ वर नेली आणि १८ वर्षीय खेळाडूने अर्मेनियाच्या मरियम मॅकर्टच्यावर अर्ध्या गुणांनी आघाडी घेतली.  


दिव्या या स्पर्धेत अपराजित राहिली आहे आणि तिने पहिले जागतिक कनिष्ठ गटातील जेतेपद नावावर केले.  

"मला वाटते की गुजरात असोसिएशनने त्याचे चांगले आयोजन केले आहे. खेळण्याची ठिकाणे चांगली आहेत, हॉटेल्स चांगली होती आणि मला येथे कोणतीही अडचण आली नाही. आशा आहे की, येथे आणखी स्पर्धा आयोजित केल्या जातील. मी चांगला खेळलो आणि माझ्या खेळाबद्दल मी समाधानी आहे,''असे दिव्या म्हणाली.

Web Title: Divya Deshmukh won the World Junior Chess Championship 2024 title in the girls section in Gandhinagar after beating Beloslava Krasteva of Bulgaria in the final round.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.