मूकबधिर खेळाडूंसाठी दिव्यांग कोचेस नेमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 02:18 AM2020-06-26T02:18:25+5:302020-06-26T02:18:32+5:30
क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीदरम्यान परिषदेने दिव्यांग कोचेस आपल्या खेळाडूंसोबत सहजपणे संवाद साधू शकतात, असे निदर्शनास आणून दिले.
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे(साई)लवकरच मूकबधिर खेळाडूंसाठी दिव्यांग कोचेसची नेमणूक होणार आहे. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी अ.भा. मूकबधिर क्रीडा परिषदेच्या शिफारशींना मान्यता दिली. क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीदरम्यान परिषदेने दिव्यांग कोचेस आपल्या खेळाडूंसोबत सहजपणे संवाद साधू शकतात, असे निदर्शनास आणून दिले.
>वूशू, हॅण्डबॉल,सेपक टॅकरॉचा खेलो इंडियात समावेश करा
गुरुवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत टेनिस, कबड्डी, बुद्धिबळ, बास्केटबॉल, ब्रिज, बिलियडर््स आणि स्नूकर, अश्वारोहण, हॅण्डबॉल, वूशू, सेपक टॅकरॉ, कयाकिंग आणि कनोईंग,स्क्वॅश, व्हॉलिबॉल, नौकानयन, आयओए तसेच एआययूचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्वांनी मार्चपासून रखडलेला सराव सुरू करण्याची मागणी केली. वूशू, हॅण्डबॉल, सेपक टॅकरॉचा समावेश ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत करण्याची मागणी या खेळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.