जोकोविच, फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: August 21, 2015 10:45 PM2015-08-21T22:45:53+5:302015-08-21T22:45:53+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच संघर्षपूर्ण, तर द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याने सहज विजय मिळवताना एटीपी आणि

Djokovic, Federer in the quarter-finals | जोकोविच, फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

जोकोविच, फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

Next

सिनसिनाटी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच संघर्षपूर्ण, तर द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याने सहज विजय मिळवताना एटीपी आणि डब्ल्यूटीए सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली; परंतु आणखी एक दिगग्ज राफेल नदाल याला मात्र पराभवाची चव चाखावी लागली.
सर्बियन खेळाडू जोकोविचला बेल्जियमच्या १३व्या मानांकित डेव्हिड गोफिनला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, २-६, ६-३ पराभूत करण्यासाठी खूप घाम गाळावा लागला; परंतु स्वीस स्टार फेडररने १५व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले. फेडररने पहिला सेट अवघ्या २१ मिनिटांत जिंकला.
आठव्या मानांकित नदालला त्याच्याच देशाच्या स्पॅनिश खेळाडू फेलिसियानो लोपेजने ५-७, ६-४, ७-६ असे पराभूत केले. अँडी मरे आणि स्टेनिसलास वावरिंकादेखील पराभवाच्या स्थितीत होते; परंतु अखेरीस ते अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.
ब्रिटनच्या तृतीय मानांकित मरेने बल्गेरियाच्या ग्रेगरी दिमित्रोव्ह याचा ४-६, ७-६, ७-५; तर वावरिंकाने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा ६-७, ७-६, ७-६ असा पराभव
केला. पाचवा मानांकित वावरिंका पुढील फेरीत जोकोविचशी दोन हात करेल. दरम्यान, महिलांच्या गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्सने इटलीच्या कारिन नॅपवर ६-0, ६-२ असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. रुमानियाच्या सिमोना हालेप, सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविच आणि झेक प्रजासत्ताकाच्या लुसी सॅफोरोव्हा व सर्बियाच्या येलेना यांकोविच यांनीदेखील अंतिम आठमध्ये प्रवेश मिळविला.(वृत्तसंस्था)

Web Title: Djokovic, Federer in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.