जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचा राजा
By admin | Published: February 1, 2015 06:49 PM2015-02-01T18:49:44+5:302015-02-01T18:49:53+5:30
टेनिसमधील अव्वल क्रमांकाचा खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटेनच्या अँडी मरेला पराभूत करत पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १ - टेनिसमधील अव्वल क्रमांकाचा खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटेनच्या अँडी मरेला पराभूत करत पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. जोकोविचच्या कारकिर्दीतील हे आठवे ग्रँडस्लॅमचे विजेतेपद आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नोवाक जोकोविच व अँडी मरे हे आमने सामने होते. तीन तास ३९ मिनीटे हा अंतिम सामना सुरु होता. साडे तीन तासांच्या चुरशीच्या लढतीनंतर जोकोविचने अँडी मरेचा ७-६, ६-७, ६-३, ६-० असा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिस-या गेममध्ये जोकोविच - मरे यांच्यात रंगलेली २७ स्ट्रोकची रॅली या सामन्याचे वैशिष्ट्य ठरली. जोकोविचसोबत झालेल्या फायनलमध्ये मरे तिस-यांदा पराभूत झाला आहे. यापूर्वी २०११ आणि २०१३ च्या फायनलमध्ये जोकोविचने मरेवर मात केली होती. रविवारच्या विजयासह जोकोविचने टेनिस रँकींगमधील अव्वल स्थान कायम राखले आहे. तर ब्रिटनचा मरे हा सहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे.