जोकोविचने केले पुनरागमन
By admin | Published: June 1, 2016 03:33 AM2016-06-01T03:33:25+5:302016-06-01T03:33:25+5:30
नोवाक जोकोविचला आज त्याच्या सामन्यात पहिला सेट गमाविल्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शनाने पुनरागमन करत रॉबर्टो बाटिस्टा विरुद्धचा दुसरा सेट ६-४ ने जिंकत बरोबरी साधली़
फ्रेंच ओपन : अग्निस्का, हालेपचे आव्हान संपूष्टात
पॅरिस : अंतिम सोळा जणांत प्रवेश केलेला जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविचला आज त्याच्या सामन्यात पहिला सेट गमाविल्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शनाने पुनरागमन करत रॉबर्टो बाटिस्टा विरुद्धचा दुसरा सेट ६-४ ने जिंकत बरोबरी साधली़ पहिला सेट जोकोविचने ३-६ ने गमाविला होता़ करिअर ग्रँडस्लॅम
जिंकण्यास उणीव असणारी
पहिली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोची तीन वेळा सर्व्हिस भंग झाली. शिवाय त्याने दोन वेळा सेल्फ ब्रेकपॉइंट घेतले. पावसापूर्वी ३७ मिनिटांचा खेळ होऊ शकला. यापूर्वी सोमवारचाही खेळ पावसामुळे रद्द झाला होता. गेल्या सोळा वर्षांत पावसामुळे अख्खा दिवस वाया जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. आजही एक तास उशिरा खेळ सुरू झाला. दुसरीकडे महिला गटात सुजेन लेंगलेन कोर्टवर बुल्गारियाच्या स्वेतलाना पिरोनकोवाने द्वितीय मानांकित अॅग्निस रंदावास्काला
२-६, ६-३, ६-३ असे नमविले़ एक नंबर कोर्टवर सामंथा स्टोसूरने सिमोना हालेपला ७-६, ६-३ असे पराभूत केले़